मोठी बातमी : खासदार अमोल कोल्हेंचा महत्वाचा निर्णय ; शोधला नवा पर्याय

राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच मी एक निर्णय घेतला आहे, अशी पोस्ट खासदार डॉ.अमोल कोल्हे (ncp mp dr amol kolhe) यांनी समाजमाध्यमावर शेअर केली आहे.
 mp dr amol kolhe
mp dr amol kolhesarkarnama
Published on
Updated on

पुणे : डॅा. अमोल कोल्हे..अभिनेता ते नेता अशी त्यांची कारकीर्द. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्यानंतर त्यांनी मराठी मनात घर केलं. शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आल्यानंतर ते खासदार झाले. सामान्य व्यक्तीच्या प्रश्नांची जाण असलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे. आता त्यांनी दुहेरी भूमिका घेतली आहे.

अभिनय अन् राजकारण या दोन्ही ठिकाणी आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणारे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कोल्हे (ncp mp dr amol kolhe) यांनी राजकारण आणि अभिनय यांची सांगड घालण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतची आपली भूमिका त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केली आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या त्यांच्या निर्णयामुळे डॉ. कोल्हे सोशल मिडियावरही दुहेरी भुमिकातून नेटकऱ्यांना भेटणार आहेत.

‘अभिनेता कि नेता...याविषयावर डॉ. अमोल कोल्हेंनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राजकारणासाठी फेसबूक तर अभिनयासाठी इंस्टाग्रामची त्यांनी निवड केली आहे. याबाबतचा निर्णय त्यांनी इंन्स्टाग्रामवर जाहीर केला आहे. डॉ. कोल्हे यांनी इंन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्टही शेअर केली आहे.

 mp dr amol kolhe
माझ्या पाठिशी मंत्र्यानं उभे राहावं: किरण गोसावी; पाहा व्हिडिओ

यात ते म्हणतात, ''इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्टवर प्रतिक्रिया देताना "अभिनेता" की "नेता"अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच मी एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे कन्फ्युजन नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना ?''

इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या खाली त्यांनी एक टीप लिहिली आहे. त्यात ते म्हणातात की, जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये. अभिनय आणि राजकारणात गल्लत करु नका…

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना धूळ चारून जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे कायमच चर्चेचा विषय असतात. एक डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि आता थेट खासदार असा त्यांचा प्रवास आहे. 2014 च्या निवडणुकांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना शिरुर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्यासमोर तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान होते. आढळरावाचा पराभव करुन ते खासदार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com