NCP News : राष्ट्रवादीच्या झेंड्याची 'ऐसी' आणि 'तैसी' भूमिका!

PM In Pune : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी पुण्यात असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
NCP
NCPSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

PM Modi Inaugurate Pune Metro : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी पुण्यात असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मात्र, कुठे त्यांचे स्वागत उत्साहपूर्ण आणि अगत्याने प्रेमपूर्वक होत असतानाच दुसरीकडे मोदींच्या पुणे भेटीवरुन विरोधही झाला. मात्र, या दरम्यान एक समान गोष्ट जी पुढे आली ती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या झेंड्याची!

जिथे मोदींच्या प्रवासाच्या वाटेवर भाजप पक्षाचे कमळ, शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घडयाळ असलेले झेंडे शेजारी-शेजारी झळकत होते. दुसरीकडे 'गो बॅक मोदी' आंदोलनात लागलेले राष्ट्रवादीचे झेंडे वेगळीच कहानी सांगत होते.

NCP
PM Visit to Pune : पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्री शिंदेंना लागली 'डुलकी'; व्हिडिओ व्हायरल

टिळक स्मारक समितीच्या वतीने 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देण्यात आला. या अनुषंगाने पुण्यनगरी पंतप्रधानांच्या स्वागताला आतुरलेली असतानाच दुसरीकडे 'गो बॅक मोदी'चे नारे ही सुरू असल्याचे दिसून आले. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर मोदी कोणतेही भाष्य करत नाही, त्याचबरोबर त्यांनी मणिपूरला अद्याप भेटही दिलेली नाही. याचाच निषेध पुण्यामध्ये विविध संघटना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व इतर पक्षांच्या वतीने करण्यात आला. या आंदोलनावेळी इतर पक्षांच्या झेंड्यांसोबतच राष्ट्रवादीचे झेंडे झळकताना दिसून आले.

विरोधकांच्या 'गो बॅक मोदी', 'गो बॅक प्राईम मिनिस्टर'च्या घोषणा देत विरोध होत असला तरीही मोदींच्या विविध ठिकाणी होणाऱ्या भेटीच्या दरम्यान, वाटेवर तीनही पक्षांचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे, राष्ट्रवादीचे झेंडेही दिमाखात डौलताना दिसून आले. विशेष, म्हणजे मोदींच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वतः उपस्थित होते.

NCP
Ajit Pawar Speech in the Pune Program : मोदींपुढेच अजितदादांनी घर विकण्यावरून थेट दमच भरला....

तर दुसरीकडे अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. राष्ट्रवादीच्याच एका गटाकडून मोदींच्या विरोधात झेंडे फडकावत विरोध केला जात होता. तर एका गटाकडून स्वागत होत होत, असा हा एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्रिवेणी संगम की त्रिवेणी विरोधाभास आज पुण्यनगरीमध्ये याची देहा याची डोळा पाह्यला मिळाला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com