Sharad Pawar News : विरोधकांच्या एकजुटीबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

NCP News : ''विरोधकांच्या एकजुटीत माझाही सहभाग असेल...''
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Mumbai : 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी विरोधक प्रयत्न करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी अनेकजण प्रयत्न करत असून विरोधकांच्या एकजुटीत माझाही सहभाग असेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार हे रविवारी (दि.7 मे) पासून दोन दिवस सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते निपाणीचा दौराही करणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या एकजुटीबाबत भाष्य केलं आहे.

Sharad Pawar
Sanjay Shirsat On Ajit Pawar : मी त्यांच्या पक्षाचा नाही म्हणून निधी नाकारला होता, तरी अजित पवार चांगला माणूस..

शरद पवार म्हणाले, "युती करायची असेल तर विविध विचारांचे पण मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन जर सर्व एकत्र येऊ शकले तर विरोधकांची एकजुट होईल. यासाठी नितीश कुमार काम करत आहेत. आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या सर्वांना सहकार्य करणं प्रोत्साहित करणं महत्वाचं आहे", असं ते म्हणाले.

"आता 10 ते 11 महिन्यानंतर देशामध्ये निवडणुकीचा विचार सुरू होईल. जेव्हा निवडणुका चार-सहा महिन्यावर येतात. त्यावेळी बाकीच्या सर्व गोष्टी थांबतात आणि सर्व लक्ष निवडणुकीकडे केंद्रित होतं. त्यावेळी आपण पर्यायी लोकांना उभ करू शकतो, त्याची आवश्यकता आहे", असंही ते यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
RTO Officer News : वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केलेल्या शेजवळांच्या विरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल !

"विरोधकांच्या एकजुटीसाठी नितीश कुमार यांच्यासह अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी अनेकजण काम करत असून यामध्ये माझाही सहभाग असेल ", असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, 2024 च्या निवडणुकीपूर्वी देशाच्या राजकारणात विरोधकांची एकजुट होऊन सर्व विरोधक एकत्र येऊन या निवडणुकीला समोरं जाणार का? हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com