Bazar Samiti Result : मंचरमध्ये वळसे पाटलांना दे धक्का : राष्ट्रवादीचे बंडखोर निकम विजयी, सत्ता मात्र महाविकास आघाडीची

माजी सभापती निकम यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Manchar Bazar Samiti Result
Manchar Bazar Samiti ResultSarkarnama

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम हेही निवडून आले आहेत. माजी सभापती निकम यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. (NCP rebel Dev Dutt Nikam won the Manchar Bazar Samiti election)

मंचर बाजार समितीच्या १८ जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना-भाजप युतीने आपला पॅनेल उभा केला होता. मात्र, युतीच्या पॅनेलला पराभावाचा सामना करावा लागला आहे. बाजार समितीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या हेात्या. उर्वरीत पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यातील १४ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला असून बंडखोर निकम हे निवडून आले आहेत.

माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वळसे पाटलांपासून दूर गेलेल्या एकाही नेत्याला आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत विजय मिळविता आलेला नव्हता. अपवाद फक्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा होता. मात्र, शिवाजीराव ढोबळे, अरुण गिरे यांना नेत्यांना पुढच्या निवडणकीत पराभवच पत्कारावा लागला होता. मात्र, निकम यांनी ती परंपरा खंडीत केली आहे.

मंचर बाजार समिती माजी मंत्री वळसे पाटील यांनी ताब्यात ठेवली असली तरी निकम यांचे निवडून येणे, हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नामुष्कीजनक ठरले आहे. कारण, राष्ट्रवादीच्या स्थानिक सर्व नेत्यांनी निकम यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आलेले नाही.

दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निकम हे मागे हेाते. राष्ट्रवादीचे सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जसजशी मतमोजणीच्या फेऱ्या होत गेल्या तसतशी निकम यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com