Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

शरद पवार याबाबत कुठला निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar , Narendra Modi
Sharad Pawar , Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Pune : यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता.१) होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निमंत्रित केले आहे.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील विधेयक याच दिवशी संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार हे मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की राज्यसभेत मतदानासाठी जाणार? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

Sharad Pawar , Narendra Modi
BJP Releases List Of Central Office Bearers : नड्डांच्या नव्या टीममध्ये मुंडे, तावडे, रहाटकरांचे स्थान कायम ; देवधर यांना वगळले..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची नुकतीच बैठक घेतली आहे. त्यांनी पवारांचीही भेट घेतली आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यसभेत मतदानासाठी उपस्थित राहावे, अशी विनंती केजरीवाल हे पवारांना करणार आहेत. त्यामुळे शरद पवार याबाबत कुठला निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar , Narendra Modi
Chandrakant Patil ON Kukdi Canal Rotation : कर्जतकरांना चंद्रकांतदादांकडून दिलासा ; कुकडीचे आवर्तन सोडणार..

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी मतदानाबाबतची व्हिप बजावण्यात आला आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्यांचे मत महत्वाचे आहे. हे विधेयक मंजूर होऊ नये, म्हणून केजरीवाल यांनी यापूर्वीही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. हे विधेयक मंजूर होऊ नये, म्हणून केजरीवाल हे प्रयत्नशील आहेत.

विधेयक मंजूर करण्यास लोकसभेत अडचण येणार नाही, कारण येथे भाजपचे बहुमत आहे, पण राज्यसभेत विरोध करणाऱ्यांची सदस्यांची संख्या अधिक असू शकते. राज्यसभेत या विधेयकाला विरोध करण्यासाठी शरद पवार यांनीही उपस्थित राहावे, असे आम आदमी पक्षाचे मत आहे. हे विधेयक 31 जुलै किंवा 1 ऑगस्ट रोजीच सभागृहात मांडले जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com