Rohit Pawar : मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमावर शरद पवारांच्या पक्षाने घेतला आक्षेप!

NCP SharadChandra Pawar MLA Rohit Pawar Mahayuti government Paithan SantPeeth Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाच्या अभ्यासक्रमावर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लवकरच मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. विद्यापीठाचा हा ‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

या अभ्यासक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत राज्य सरकारला विनंती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून उर्जितावस्था द्यावी. आणि त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरू केला तर, ते अधिक योग्य ठरेल रोहित पवार यांचे म्हणणं आहे.

Rohit Pawar
Vijay Wadettiwar : 'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही'; भुजबळ-फडणवीसांच्या मैत्रीवर वडेट्टीवार यांचा टोला

रोहित पवार यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "सावित्रीबाई फुले पुणे (PUNE) विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधी द्यावा. उर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरू केला तर ते अधिक योग्य ठरेल".

Rohit Pawar
Sanjay Raut : 'ते राजे आहेत, बोलण्यापेक्षा त्यांनी थेट पूर्तता करावी'; संजय राऊतांचा उदयनराजेंना टोला

इतर विद्यापीठांनी मात्र आपल्या कार्यकक्षेबाहेरील विषयांत नाक खुपसण्यापेक्षा ढासळणारी गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. युवा पिढी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी 'डाटा सायन्स', 'नॅनो टेक्नॉलॉजी', 'एआय' यासांरखे बदलत्या तंत्रज्ञानाधारीत अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठातून बाहेर पडणारी पिढी ही बेरोजगार न राहता त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, याचा प्रयत्न करावा.

तसंच विद्यापीठाने आपलं काम करताना विज्ञान आणि अध्यात्म याची गल्लत करू नये. राज्य सरकार आणि कुलपती महोदयांनीही यामध्ये लक्ष घालावं, ही विनंती! असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com