Dr Amol Kolhe On BJP: विरोधकांचा आवाज दाबण्याची सत्ताधाऱ्यांची नीती; खासदार कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

Political News: 'जन की बात' ऐकण्यापेक्षा फक्त 'मन की बात' करण्यात केंद्र सरकारला स्वारस्य; खासदार कोल्हेंचा टोला
Dr Amol Kolhe
Dr Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: 'एनडीए'च्या केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत गुरूवारी चर्चा झाली. यामध्येत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना फक्त तीन मिनिटेच अध्यक्षांनी बोलू दिले होते. त्यावर सरकार उघड उघड विरोधकांचा आवाज दाबत आहे, असा हल्लाबोल खासदार कोल्हेंनी आज केला.

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सव्वादोन तास, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दीड तास बोलण्याची संधी दिली. मात्र, आपल्यासह विरोधी बाकावरील सदस्यांना फक्त काही मिनिटेच बोलू दिल्याबद्दल खासदार कोल्हेंनी आज प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Dr Amol Kolhe
Nawab Malik Bail: मलिकांना जामीन मंजूर होताच रोहित पवारांचे ट्विट; 'या' विरोधात लढण्याचा केला निर्धार

अशाप्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याची सत्ताधारी पक्षाची नीती त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती स्पष्ट करतेय, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधारी पक्षातील इतर अनेक नेत्यांना बोलण्यासाठी मिळालेले 'तासंतास' वेगळेच. पण विरोधकांना मात्र, तुलनेत अतिशय कमी वेळ मिळाला, हे साऱ्या देशाने पाहिले, हातच्या कंकणाला आरसा कशाला? असे ते म्हणाले.

सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे, असा हल्लाबोल खासदार कोल्हेंनी केला. केंद्रातील सरकारला केवळ स्तुती ऐकण्याची सवय आणि इच्छा आहे. स्वतःच्या 'कामगिरी' बद्दल काहीही ऐकून घ्यायचं नाही, कोणताही आरसा पहायचा नाही. शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची 'जन की बात' ऐकण्यापेक्षा फक्त 'मन की बात' करण्यात सरकारला स्वारस्य आहे, असा टोला त्यांनी लगावला. तरीही लोकशाहीचा विजय असो! अशी कोपरखळी त्यांनी मारली. पराभव आधी रणात नाही, मनात होतो, असेही ते म्हणाले.

Dr Amol Kolhe
Anil Deshmukh On Malik Bail: मलिकांना जामीन मंजूर होताच अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, 'महाराष्ट्रातच नाही तर...'

खासदार कोल्हेंच्या कालच्या आवेशपूर्ण अस्खलित हिंदीतील भाषणाची जोरदार चर्चा आजही सुरुच होती. अवघ्या तीन मिनिटात त्यांनी मोदींसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळे त्यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांकडून वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. लोकसभा अध्यक्षांनीही त्यांना आपले भाषण आटोपते घेण्यास सांगितले.

दरम्यान, त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमाकांवर असल्याचा धिंडोरा पिटणाऱ्या मोदी, शाह आणि भाजपचे लक्ष भारत हा दरडोई उत्पन्नात जगात १४१ व्या नंबरवर असल्याकडे वेधले होते. तसेच देशातील वाढते उत्पन्न हे मोजक्या उद्योगपतींच्याच खिशात जात असल्याचे सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com