लखीमपूर हिंसेवरून लक्ष वळवण्यासाठीच कारखान्यांवर धाडी!

उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेचा आम्ही तिन्ही पक्षांनी खेद व्यक्त केला.
Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी बुधवारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने छाड टाकली आहे. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. (NCP State President Jayant Patil criticizes BJP)

Jayant Patil
माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले ?

जयंत पाटील पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते या वेळी ते म्हणाले, लखीमपूर खिरी येथील हिंसेवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. केवळ सनसनाटी निर्माण करणे हाच या धाडीमागचा हेतू आहे, असे पाटील यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेचा आम्ही तिन्ही पक्षांनी खेद व्यक्त केला. सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. जालियनवालाबाग हत्याकांडासारखाच प्रकार भाजपने केला आहे. दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम सुरू आहे. त्या घटनेला भाजप जबाबदार आहे. असे धाडसत्र करून लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचे काम भाजप करत, असल्याची टीका पाटील यांनी केली.

Jayant Patil
भाजप खासदारानेचं केंद्रीय मंत्र्यांना आणलं अडचणीत; 'तो' थरारक व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, या वेळी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सगळीकडे आम्ही आघाडी करू शकलो नाही तरीही महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. जर आघाडी झाली तर भाजपपेक्षा आमची ताकद मोठी आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न असले. दोन चार टक्के होणार नाही. मात्र, आम्ही आगामी निवडणुकीत आघाडी करणार, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com