Supriya Sule : टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात !

Supriya Sule : सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय.
Eknath shinde,  Supriya Sule
Eknath shinde, Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी रविवारी जहरी टीका केली आहे. सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. "राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात," अशा शब्दात सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. (ncp supriya sule slams cm eknath shinde)

सुळे म्हणाल्या, "ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत,अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्या तरी घरीच दिसतात,"

"महाविकास आघाडी सरकारचे सगळे नेते सकाळी 7 वाजल्यापासून कामे करत होती. तसेच दर शुक्रवारी मॅरेथॉन मिटिंग घ्यायचे.राज्यात पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी सहा वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल." असे सुळे म्हणाल्या.

Eknath shinde,  Supriya Sule
Shiv Sena : पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करणे महाराष्ट्राचा अपमान, रामदेव बाबा, मुख्यमंत्र्यांना टोला

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंडबाजी ईडीचे सरकार असल्याची खोचक टीका शनिवारी सुळे यांनी केली होती. "50 खोके ऑल ओके वाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती. सध्या सरकारमधील लोक कार्यक्रमांना भेटी देणं सोडतील तर जनतेची सेवा करतील ना… हे एवढे सेलिब्रेशन करण्यात एवढे व्यस्त आहेत की बस्ता बांधला त्यानंतर लग्न केले. मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com