आपटाळे (जि. पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी जुन्नर (Junnar) तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील माणिकडोह येथे उपमुख्यमंत्री असताना अचानकपणे त्यांच्या ताफ्यात नववधू आणि वरांची एन्ट्री झाली. अचानकपणे झालेल्या या नवदांपत्याच्या एन्ट्रीने सारेच अचंबित झाले. अजित पवार यांनीही या नवविवाहित दांपत्याला आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्र्यांचा अनपेक्षितपणे आशीर्वाद मिळाल्याने या नवदांपत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. (Newlyweds enter Deputy Chief Minister Ajit Pawar's convoy)
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खामगावचे उपसरपंच आणि आमदार अतुल बेनके यांचे कट्टर समर्थक अजिंक्य घोलप आणि नीलम वायाळ यांचा विवाह शुक्रवारी (ता. २२) झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. पवार हे सायंकाळी सहाच्या सुमारास माणिकडोह केंद्रातील बिबट्यांची पाहणी करून जुन्नरकडे जात होते. त्यावेळी अचानकपणे नवविवाहित दांपत्याची समोरून एन्ट्री झाली.
आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार यांना या दांपत्याबाबत माहिती दिली. नवदांपत्याने पवार यांचे आशीर्वाद घेतले. अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देत या जोडप्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार बेनके, सभापती ॲड संजय काळे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पूजा बुट्टे पाटील, सूरज वाजगे, धनराज खोत, भूषण ताथेड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुष्यातील कधीही न विसरणारा क्षण : अजिंक्य घोलप
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या लग्नाच्या दिवशीच आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्यात आल्याने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. माझ्या आयुष्यातील हा कधीही न विसरणारा क्षण आहे, असे नवरदेव अजिंक्य घोलप यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.