Pune Metro
Pune Metro

Pune Metro : पर्यावरणवाद्यांना झटका : पुणे मेट्रोबाबत दाखल केलेली याचिका एनजीटीने फेटाळली...

मुठा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतून मेट्रोचा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा मार्ग जात आहे.
Published on

Pune Metro news: मुठा नदीपात्रातील पुणे मेट्रोच्या (Pune Mtero) मार्गामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पुर पातळीत वाढ होऊ शकते, याबाबत पर्यावरण वादींनी दाखल केलेली याचिका पर्यावरणवादींची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) रद्दबातल केली आहे.. एनजीटीचे न्यायिक सदस्य दिनेशकुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ.विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

माजी खासदार अनु आगा, आरती किर्लोस्कर, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांच्यासह इतरांनी मुठा नदीतील पुर पातळीसह इतर बाबींचा उल्लेख असलेली याचिका दाखल केली होती. या प्रकरणात पुणे महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली. मुठा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतून मेट्रोचा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा मार्ग जात आहे. यासाठी नदीपात्रात पिलर्स उभारण्यात आले आहेत. पण यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पुर पातळीत वाढ होईल, याबाबत पर्यावरणवादींनी दाखल केलेली याचिका दाखल केली होती. पण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) रद्दबातल केली आहे.

Pune Metro
Co-operative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुका 'या' कारणामुळे पुढे गेल्या ; सरकारचं स्पष्टीकरण

पुणे मेट्रोसाठी एनजीटीने ऑक्टोबर २०१७ मध्ये नदीपात्रातील बांधकामांचा परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली केली होती. जानेवारी २०१८ मध्ये या समितीने या मेट्रो पिलर्समुळे पुर पातळीत जास्तीत जास्त १२ मिलिमीटर वाढ होर्इल, असा अहवाल सादर केला. समितीच्या अहवालाच्या आधारे एनजीटीने नदीपात्रातील बांधकामाला हिरवा कंदील दाखविला. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असून त्यामुळे जनतेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. पर्यावरणाबाबतही योग्य ती काळजी घेतली जात असल्याने या प्रकल्पात हस्तक्षेप करणे योग्य नाही. तसेच पिलर्सचे काम आधीच पूर्ण झाले असल्याचेही एनजीटीने निकालात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com