शरद पवारांच्या टीकेला सीतारामन यांनी बारामतीत येऊन असे दिले उत्तर

घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत रणशिंग फुंकणार : निर्मला सीतारामन यांची घोषणा
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Sarkarnama
Published on
Updated on

बारामती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत परिवर्तनासाठी बारामतीतील (Baramati) घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली. दरम्यान, आपण बारामतीकरांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांनी उपस्थितांना ‘मी जे बोलते आहे, ते तुम्हाला समजते का,’ असे जाहीरपणे विचारले. लोकांनीही ‘होय..’ असे उत्तर दिल्यानंतर ‘तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे,’ असे सांगत दोन्ही हात उंचावून सांगा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर दोन्ही हात वर करून तुमची भाषा समजत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अशा पद्धतीने सीतारामन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. (Nirmala Sitharaman responded to Sharad Pawar's criticism by coming to Baramati)

बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी घराणेशाही व भ्रष्टाचार या विरोधात काम करण्यासाठी बारामतीत भरपूर संधी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात मतदारांपर्यंत पोहोचत केंद्राच्या सर्व योजना मतदारांना समजून सांगाव्यात, असे आवाहन केले. एकाच मतदारसंघात होणारी प्रगती दूर करून सर्व मतदारसंघात समान विकास साध्य केला पाहिजे, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

Nirmala Sitharaman
‘...तर सोलापुरातील ९३ वर्षांची जुनी ‘लक्ष्मी बँक’ वाचली असती’

बारामतीतील भाजप कार्यालयामध्ये तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके तसेच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निर्मला सीतारामन यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला आवाज हा लोकांपर्यंत पोहोचत असून आपली भाषादेखील केवळ कार्यकर्तेच नाहीत, तर या ठिकाणी उपस्थित नागरिकांनाही समजत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

Nirmala Sitharaman
महाडिक गटाला धक्का; सतेज पाटील गटाची सरशी : राजाराम कारखान्याचे १३२६ सभासद अपात्र

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भाषा बारामतीकरांना जरूर समजेल, असा खोचक उल्लेख केला होता. तो धागा पकडून निर्मला सीतारामन यांनी आज थेट शरद पवार यांना हा संदेश दिला गरिबी हटावचा नारा घेऊन काँग्रेसने २० कलमी कार्यक्रम आखला होता. मात्र, रायबरेली किंवा अमेठीमध्ये देखील विकासाचे काम होऊ शकलं नाही. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्व मतदारसंघात समान विकासाचे सूत्र नजरेसमोर ठेवून सबका विकास हेच ध्येय कायम ठेवत काम सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Nirmala Sitharaman
एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा असा ठरला फॉर्म्युला?

बारामतीमध्ये येऊन भाजपचे संघटन मजबूत करणारे आणि हे नाते केवळ निवडणुकीपुरते नसून कायमस्वरूपी राहील याचा उल्लेख करण्यासही निर्मला सीतारामन विसरल्या नाहीत. ‘चुनाव का रिश्ता नही है…’ अशा शब्दांत त्यांनी हे ऋणानुबंध कायम राहतील, असे अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, भाजपचे संघटन मजबूत करण्याचा एक भाग म्हणून माझा बारामती दौरा होता. मात्र, माझ्या बारामतीच्या दौऱ्यामुळे वातावरण गरम होत असल्याचे आपल्या निदर्शनाला आले. वास्तविक जे चांगले काम करत आहात, ते करत राहा. पण बारामतीत माझ्या दौऱ्याची एवढी गरमागरम चर्चा का, असा मिश्किल उल्लेख आहे त्यांनी केला.

या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, एका मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास इतर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घराणेशाहीतून ‘भाई-भतिजावाद’ व त्यातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यासाठी शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील, अशी थेट टीका निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली.

भाजपचे चारित्र्य मात्र सर्वांचा समान विकास व्हायला पाहिजे असाच आहे. मतदारसंघातील ठराविक वर्गाला विकासाच्या दृष्टिकोनापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणजे वंशवादाला खतपाणी घालण्यासारखाच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com