बारामतीची लढत भाजपने मनावर घेतली; सीतारामन यांचा अवघ्या दोन महिन्यांत दुसरा दौरा

सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल बारामतीत मुक्कामी येणार आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सीतारामन यांचा हा दौरा असणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने (Bjp) गांभीर्याने घेतल्याचे हे संकेत आहेत. (Nirmala Sitharaman will be back on Baramati tour)

‘भाजप’च्या मिशन ‘बारामती लोकसभा’ जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचा एक भाग म्हणून सप्टेंबरनंतर अवघ्या दोन महिन्यांतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल बारामतीत मुक्कामी येणार आहेत.

Nirmala Sitharaman
पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलने सरासरी दीड हजाराच्या फरकाने ‘घोडगंगा’चे मैदान मारले!

याबाबत भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख अविनाश मोटे यांनी माहिती दिली. मोटे म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबर अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुुरु केली आहे.

Nirmala Sitharaman
सत्तारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; ‘जे काही घडलं ते घृणास्पद होतं...’

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल त्यासाठी ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी बारामतीत मुक्कामी येणार आहेत. ते ११ नोव्हेंबर रोजी खडकवासला, भोर, पुरंदर,जेजुरीमार्गे पटेल बारामतीत येणार आहेत. यावेळी पटेल यांच्यासमवेत आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Nirmala Sitharaman
रूपाली चाकणकरांनी माझा फोनच उचलला नाही : सुषमा अंधारेंचा आरोप

पटेल हे येथील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीच्या प्रमुखांना भेटणार आहेत. यामध्ये पटेल चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील निवासस्थानी मुक्कामी येणार आहेत. याचवेळी ते राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटेल १२ नोव्हेंबर रोजी इंदापूर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर पुण्यातील कौन्सिल हॉल येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com