शिरुरच्या `डॅडीं`ची आमदार पवारांसाठी माघार; बबड्याला आता `राम राम!`

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (PDCC Bank election) निवडणुकीत बहुतेक आमदारांच्या बिनविरोध निवडी
Ashok Pawar-Nivrutti Gavare

Ashok Pawar-Nivrutti Gavare

Sarkarnama

शिक्रापूर :  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC Bank) सध्या सर्वात ज्येष्ठ समजले जाणारे संचालक निवृत्तीआण्णा गवारे यांनी अखेर आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना पाठींबा देत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून माघार घेतली. गेली दोन पंचवार्षिक निवडणुकीत 'डॅडी' म्हणून माजी सभापती मंगलदास बांदल यांचे सोबत जिल्हा बँक निवडणूक गाजविणारे गवारे यांनी बांदल यांचे कट्टर विरोधक आमदार पवार यांच्यासोबत जाण्याचा यावेळी निर्णय घेतला आणि आपल्या लाडक्या 'बबड्या' ला 'रामकृष्ण हरी' म्हणत शिरूर-हवेलीच्या राजकारणात  आमदार पवारांची वाट सुकर करून दिली.

Ashok Pawar-Nivrutti Gavare

‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या `अ` वर्गात शिरूर मतदारसंघात गेली तीन पंचवार्षिक गवारे आण्णांचा दबदबा राहिला. मोठे पवार साहेब दैवत आणि उपमुख्यमंत्री आजित पवार नेते म्हणत गवारेंनी आपले जिल्हा बँकेतील स्थान अढळ ठेवले. वय ७९ आणि बँकेतील चौथी टर्म यामुळे यावेळी गवारे उभे राहणार का याची उत्सुकता असतानाच गवारे यांनी आपला उमेदवारी भरून रंगत आणली होती. उमेदवारांचे प्रचार काम दोन्ही बाजूंनी सुरु होवून काही भाजपा, सेना व काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आण्णांसाठी प्रचारी कंबर कसायला सुरवात करताच आज आण्णांनी थेट आमदार पवारांसाठीच माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण शिरूर - हवेली मतदारसंघात एकच राजकीय गदारोळ झाला.

Ashok Pawar-Nivrutti Gavare

दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

याबाबत गवारे यांच्या कुटुंबीयांनाही या निर्णयाची माहिती त्यांनी कळू दिली नसल्याचेही खात्रीलायक सूत्र सांगतात. पर्यायाने कधीकाळी बांदलांचे डॅडी म्हणवले जाणारे गवारे आण्णा यांनी या त्यांच्या निर्णयाने त्यांनी आपल्या लाडक्या बबड्याला राम राम ठोकला असून आमदार पवारांची शिरूर हवेलीतील राजकारणाची एकहाती वाट सुकर करून दिली असे म्हणता येईल.

ता दोन आबांबाबत उत्सुकता !

Ashok Pawar-Nivrutti Gavare

शिरूर बाजार समितीतील 'मंगल'मय घडामोडी अशोक पवारांनी टाळल्या

गवारेंच्या माघारीने आमदार पवारांचे मोठे आव्हान दूर झालेले आहे. मात्र आबासाहेब गव्हाणे व आबा सोनवणे या दोन जणांचे अर्ज अजूनही शिरूर `अ` वर्ग मतदार संघात कायम असल्याने हे दोन आबा कशी व कधी माघार घेणार याची उत्सुकता तर आहेच शिवाय आमदार पवार यांची मुत्सद्देगिरीची इथे कसोटीही लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com