MPSC Exam : वयोमर्यादा नको; संधी वाढवून द्या, मेगाभरतीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची नवी मागणी

MPSC Exam : 'एमपीएससी'कडून आठ हजार पदांच्या भरतीची घोषणा, पण...
MPSC
MPSC Sarkarnama

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन दिवसांपूर्वी मोठ्या भरतीची घोषणा केली. त्यामुळे याचा फायदा एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. एमपीएससीकडून तब्बल आठ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

यामध्ये लिपिक व टंकलेखक संवर्गासाठी तब्बल सात हजार ३३४ पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

मात्र, या वयोमर्यादेच्या अटीमुळे अनेकांची संधी नाकारली जात असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे आमचे दोन वर्ष वाया गेले आहेत. सरकारने वयोमर्यादा वाढविली. मात्र, या काळात एकही सरळसेवा भरती प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे वयोमर्यादेऐवजी दोन वर्षांची संधी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी केली आहे.

MPSC
Marathwada Teacher Constituency : भाजपची उमेदवारी किरण पाटलांना, पण प्रतिष्ठा पणाला लागली बावनकुळेंची..

याच विषयावर 'सकाळ'शी बोलताना एका विद्यार्थींनीने सांगितले की, ''शासनाने १७ डिसेंबर २०२१ च्या अध्यादेशानुसार जी सूट दिली आहे. तिची कालमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. मात्र, या कालमर्यादेत राज्यसेवा व संयुक्त परीक्षा वगळता इतर कोणत्याही पदभरतीच्या जाहिराती आल्या नाही. सरळसेवेची कोणतीच भरती या काळात झाली नाही. त्यामुळे वयोमर्यादेऐवजी दोन वर्षाची संधी वाढवून दोण्यात यावी'', असे मागणी तिने केली.

दरम्यान, ''एमपीएससीच्या नव्या जाहिरातीमुळे अनेक उमेदवारांची आशा पल्लवीत झाली आहे. त्यामुळे निदान ही भरती प्रक्रिया तरी पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा उमेदवारांना विश्वास आहे'', असंही ती म्हणाली.

MPSC
Raosaheb Danve : परीक्षा म्हटलं की घाम फुटतो का ? दानवेंची विद्यार्थ्यांशी `परीक्षा पे चर्चा`..

काय आहे उमेदवारांची मागणी ?

वयोमर्यादा वाढवून मिळाली. मात्र, त्या कालमर्यादेत सरळसेवेची एकही भरती निघाली नाही. तसेच दरवर्षी एमपीएससीची नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जाहिरात येते. यंदा मात्र उशिरा आली. २०१९ ते डिसेंबर २०२३ पर्यंत झालेल्या बहुतेक पदभरत्या एकतर रद्द झाल्या किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. राज्य शासनाने ७५ हजारांची भरती घोषित केली. मात्र, कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आमची संधी जायला नको. केंद्र सरकारने तीन वर्षांची सवलत दिली. राज्यानेही तसा विचार करावा.

MPSC
Aditya Thackeray News : गद्दार वाचणार नाहीच, त्यांना आज ना उद्या घरी जावे लागणार..

दरम्यान, ''स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. सरकारने आम्हाला वयोमर्यादेची सूट दिली. मात्र, त्याकाळात एकही सरळसेवा भरती झाली नाही. म्हणजे आगीतून फुफाट्यात टाकल्यासारखी स्थिती आहे. आम्हाला वयोमर्यादेची नाही तर परीक्षा देण्याची संधी वाढवून द्यावी'', अशी मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com