Pune Police News : पुण्यात विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा 'राम भरोसे'; पोलीस निरीक्षकाची जागा रिक्तच

Pune Police : ...त्यामुळे शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब असलेल्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर!
Pune News
Pune NewsSarkarnama

Pune : पुणे शहरातील सदाशिव पेठ भागात मंगळवारी (दि.२७) भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांनी मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. मात्र,यावेळी हाकेच्या अंतरावरील पेरूगेट पोलिस चौकी बंद होती. तसेच पोलीस घटनास्थळी देखील उशिरा पोहचले. यामुळे आधीच वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच सदाशिव पेठेतील घटनेनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सदाशिव पेठे(Sadashiv Peth)तील थरारक प्रसंगात पोलीस पोहचण्यापूर्वी केवळ नागरिकांच्या प्रयत्नांमुळे तरुणी बचावली. महत्वाची बाब म्हणजे मागील सात दिवस विश्रामबाग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूकच करण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब असलेल्या पुणे शहरात महिलांची सुरक्षितता ‘राम भरोसे'च असल्याचं पाहायला मिळालं आहे.

Pune News
Talathi Bharti : तलाठीपदाच्या जाहिरातीत गोंधळात गोंधळ; आयुक्तालयाने मागविला खुलासा !

एखाद्या घटनेनंतर पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ पाच ते सात मिनिटे असतो. परंतु, मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता घटना घडल्यानंतर पोलिस उशिराने म्हणजे १०.१० वाजता पोहचले. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी केवळ नागरिकांच्या प्रयत्नांमुळे तरुणी बचावली. महत्वाची बाब म्हणजे गेली सात दिवस विश्रामबाग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूकच केलेली नव्हती. या सर्व बाबी पाहता शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब असलेल्या पुणे शहरात महिलांची सुरक्षितता ‘राम’भरोसेच असल्याचे समोर आलं आहे.

'अशा' अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

वानवडी परिसरात रिक्षाचालकाकडून आयटी कंपनीतील एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तातडीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु काही पोलिस अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गुन्ह्यांचे तपास गतीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता कुचकामी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत.

Pune News
Leshpal Javlagi News : "...म्हणून मला यापुढे सत्काराला बोलावू नका !"; जिगरबाज लेशपालची भावनिक साद

कारवाई सुरू पण...

पुणे(Pune City) शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून ‘एमपीडीए’ आणि गुंड टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. परंतु गुन्हेगारी घटना कमी होताना दिसत नाहीत. मोक्काच्या गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरारीच आहेत. शहरात गुंड टोळक्यांकडून कोयते हातात घेऊन वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याच्या घटना सुरूच आहेत. यावरून पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांच्या 'त्या' योजना अपयशी...

पोलिसां(Police)नी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलीस काका’, ‘पोलीस दीदी’, ‘दामिनी पथक आणि ‘बडीकॉप’ अशा योजना सुरू केल्या. पण त्याचा काडीचा उपयोग झाला नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com