Gajya Marane : गुंड गजा मारणेला अटक; पुणे पोलिसांनी वाईजवळ घेतले ताब्यात

Gajya Marane Arrest | दोन दिवसांपूर्वी याच टोळीतील कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं होतं.
Gajya Marane Arrest
Gajya Marane Arrest

Gajya Marane Arrest | सातारा : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने साताऱ्यातील वाईजवळ मारणेच्या मुसक्या आवळल्या. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या चार कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्या फार्महाऊसवर मारणे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि बाकीह सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

Gajya Marane Arrest
Uddhav Thackeray यांनी मानले शरद पवारांचे आभार...

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मारणेच्या टोळीतल्या कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधूल त्याला ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खूनाच्या बदल्यात खून प्रकरणातील प्रकाश बांदिवडेकर सराईत गुन्हेगार आहे. बांदिवडेकर याच्याविरुद्ध खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल असून त्याने सांगली आणि पुण्यातील एका व्यवसायिकाचं वसुलीसाठी अपहरण केलं होतं. त्यासाठीमारणेच्या टोळीने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती.

दरम्यान या खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप , हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत, फिरोज महंमद शेख, गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णाराव मारणे, संतोष शेलार , मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे यांच्यावर अपहरण, मारहाण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी देणे, याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com