बाप रे ! : सैन्यातील एक लाख २३ हजार पदे रिक्त

भारतीय सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्येही दोन हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत.
army.jpg
army.jpg
Published on
Updated on

पुणे, ता. ३० : भारतीय सशस्त्र सेनेच्या तीन्ही दलांसह वैद्यकीय विभागात एक लाख २१ हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे राज्यसभेतील चर्चेतून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक रिक्त जागा या सैन्य दलाच्या (भूदल) असून, यामध्ये ९० हजार ६४० सैनिकांच्या तर सात हजार ९१२ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. राज्यसभेत खासदार नीरज डांगी यांच्या प्रश्नाला संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तर दिले. त्यात ही बाब समोर आली.(ohh.. One lakh 23 thousand posts vacant in the army)  

भारतीय सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्येही दोन हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. लष्करामध्ये पदोन्नतीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, रिक्त जागा भरणे, तसेच लष्करातील नोकरीकडे तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. अशी माहिती डांगी यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

 देशातील तरुण-तरुणींना लष्करात सामील करून घेण्याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये सातत्याने मार्गदर्शन आणि व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) शिबिरांचे आयोजन करत प्रोत्साहित केले जात आहे. तिन्ही दलांमध्ये अधिकारी पदांसाठी विविध योजनांतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

 सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरीही कित्येक जागा रिक्त आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने उमेदवार लष्करातील विविध प्रवेश प्रक्रियांचे अर्ज भरतात, लेखी परिक्षा देतात. परंतु काही उमेदवारांचीच निवड होत असून बहुतांश तरुण लष्करा ऐवजी खासगी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com