Chinchwad By Election : पहिल्या दिवशी पाटी कोरी; एकही उमेदवारी अर्ज चिंचवडला दाखल नाही

Election : पहिल्याच दिवशी वीस इच्छूकांनी ३४ उमेदवारी अर्ज नेले, पण...
Chinchwad by-election
Chinchwad by-electionSarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज तथा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकही हा अर्ज आला नाही. मात्र, २० इच्छूकांनी हे ३४ अर्ज नेले.

Chinchwad by-election
Satyajeet Tambe; विखे-पाटील यांना सत्यजीत तांबे आमदार झालेले चालतील का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, तर भाजप, एमआयएम, आऱपीआय, वंचित आणि पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीच्या प्रत्येकी एकेका इच्छूकासह १२ अपक्षांनी हे अर्ज नेल्याची माहिती चिंचवडचे समन्वय अधिकारी (माध्यम कक्ष) किरण गायकवाड यांनी दिली. मात्र, आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Chinchwad by-election
Prabhakar More Joins NCP : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री; हाती बांधलं 'घड्याळ'!

राष्ट्रवादीचे इच्छूक राजेंद्र जगताप यांच्यासह या पक्षाच्या माजी नगरसेविका माया बारणे तसेच संतोष बारणे, भाजपकडून बायडाबाई ऊर्फ कल्पना काटे, एमआयएमच्या नावाने जावेद शेख, आऱपीआयचे अॅड. अनिल सोनवणे, वंचितचे रविंद्र पारदे यांच्यासह बारा अपक्ष आणि इतरांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

तो सादर करताना खुल्या वर्गातील उमेदवाराला दहा, तर एससी, एसटीसाठी पाच हजार रुपये भरावे लागणार आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवाराला फक्त एकच, तर बाकीच्यांना दहा सूचक द्यावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com