Amol Kolhe, Dhananjay Munde
Amol Kolhe, Dhananjay MundeSarkarnama

Amol Kolhe Kanda Andolan: सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम

Onion Rate Issue In Maharashtra: कांद्याला चार हजार रुपये दर देण्याची मागणी
Published on

Pune Political News: कांद्याच्या पडलेल्या दरावरून राज्यातील राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे केंद्र सरकार शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. कांद्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर येथील आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. (Latest Political News)

राज्यात निर्माण झालेल्या कांद्याच्या दराची कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले. त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुंडेंनी आंदोलनकर्ते कोल्हेंना थांबण्याचे आवाहन केले. मात्र सरकारने दिलेला दर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका खासदार कोल्हे यांनी केली. सरकारने कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये दर देण्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कोल्हेंनी घेतली.

Amol Kolhe, Dhananjay Munde
Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 'या' दराने खरेदी करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा

खासदार कोल्हेंनी पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण दोन्ही महामार्ग रोखत शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर बसले आहेत. दरम्यान, केंद्र आणि राज्यसरकारकडून राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली जाणार असल्याची घोषणा केली. या कांद्याला दोन हजार ४१० रुपये असा प्रति क्विंटल दर देण्याचेही सरकारने जाहीर केले. मात्र हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याचे कोल्हेंनी टीका केली. कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी करत कोल्हेंनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Amol Kolhe, Dhananjay Munde
Satara Congress News : कॉंग्रेस वर्किंग कमिटीतही डावलले; पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीतील वजन घटलं?

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करून कांदा आजपासूनच खरेदी करण्यात येणार आहे. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल २४१० रुपये दर मिळणार असल्याने यातून राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. मात्र हा निर्णय निर्णय मान्य नसून कांदाप्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर अमोल कोल्हे ठाम राहिले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com