Loksabha Election Women Candidates
Loksabha Election Women CandidatesSarkarnama

Pune District Lok Sabha Election : पुणे जिल्ह्याच्या मतदारसंघांतील 138 उमेदवारांमध्ये अवघ्या दहाच महिला!

Loksabha Election Women Candidates : सुशिक्षीत पुणे लोकसभेला महिला उमेदवार देण्यात मात्र ऊणे, 35 मध्ये फक्त तीनच महिला

Loksabha Election 2024 : देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांत निम्म्या महिला असल्या, तरी त्या तुलनेत महिला खासदारांचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण तेवढ्या प्रमाणात त्या निवडणुकीला उभ्या राहत नाहीत. कारण मुख्य राजकीय पक्ष त्यांना उमेदवारीच देत नाही. दुसरीकडे त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या, तरी निवडून येत नाहीत.अशा दुष्टचक्रात महिलावर्ग अ़़डकून पडला असून त्यातून आता 2029लाच त्यांची सुटका होणार आहे.

2024च्या लोकसभा निवडणुकीतही महिला उमेदवारांची संख्या नगण्यच आहे. पुणे जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर तेथे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. तेथे 138 उमेदवार रिंगणात असून त्यात फक्त दहा महिला आहेत. म्हणजे हे प्रमाण दहा टक्केही नाही. त्यातही मावळ आणि शिरुरमध्ये फक्त एकेकच महिला उमेदवार आहेत. त्यामुळे आतापर्यंत पुणे, शिरुर आणि मावळमध्ये कोरी राहिलेली महिला खासदारकीची पाटी यावेळीही तशीच राहणार आहे. कारण तिन्ही ठिकाणी जिंकून येऊ शकणारे मोठ्या राष्ट्रीय राजकीय पक्षांचे उमेदवार पुरुषच आहेत. तर, तेथील महिला उमेदवार या अपक्ष असल्याने त्या विजयी होणार नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Loksabha Election Women Candidates
Sule Vs Pawar : धमक्या देणाऱ्यांना सांगा, विधानसभा फार लांब नाही; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ललकारले

शिरुर (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघात यावेळी 32 उमेदवार शर्यतीत असले, तरी त्यात फक्त एकच महिला आहेत. त्याही अपक्ष असल्याने निवडून येणार नाहीत. म्हणजे शिरुर महिला खासदारापासून यावेळीही वंचितच राहणार आहे. यापू्र्वीही तेथे लोकसभा निवडणुकीत सुद्धा 6 महिलांनी अपक्ष खासदार होण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण झाले नाही. ते पूर्ण होण्यासाठी आता पुढील पंचवार्षिकची वाट पाहावी लागणार आहे. कारण 2029 पासून लोकसभेसह विधानसभेलाही 33 टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यात आतापर्यंत महिला खासदार न झालेला शिरुर, मावळ आणि पुणे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला, तर तेथे महिला खासदार होऊ शकतात. त्यामुळे महिलांची निगडीत समस्या अधिक प्रभावीपणे संसदेत मांडल्या जातील.

मावळचे आतापर्यंतचे तिन्ही खासदार हे पुरुषच झालेले आहेत. काऱण तेथेही मोठ्या राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देणेच टाळले आहे. यावेळीही त्याची पुनरावृत्ती झाली. तेथे जिंकून येऊ शकणारा उमेदवार हा पुरुषच आहे. 33 उमेदवार रिंगणात आहेत. परंतू, त्यात फक्त एकच महिला आहे. आघाडी आणि महायुतीने महिला उमेदवार दिलेला नाही. तर, वंचित बहूजन आघाडीने माधवी जोशी यांना दिला आहे. पण, त्या निवडून येणार नाहीत. त्यामुळे मावळमध्ये महिला खासदार यावेळीही होणार नाही.

Loksabha Election Women Candidates
Chitra Wagh On Supriya Sule : 'तोंडाने म्हणायचे रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटणकरी' चित्रा वाघांची सुळेंवर टीका !

सुशिक्षित पुणेही महिला खासदारांच्या बाबतीत उणेच आहे.तेथेही आतापर्यंत फक्त पुरुषच खासदार झालेले आहेत. यावेळी सुद्धा महिला खासदार होणारच नाही. कारण 35 उमेदवारांत फक्त तीन महिला असून त्या अपक्षच आहेत. त्यामुळे त्या विजयी होण्याचा प्रश्नच नाही. बारामतीत, मात्र पुन्हा महिला खासदार होणार आहे. कारण तेथील प्रमुख दोन्ही उमेदवार (आघाडी आणि महायुतीच्या) या महिला आहेत.

तेथे 1952 नंतर 2009ला प्रथमच सुप्रिया सुळे(Supriya Sule) या खासदार झाल्या. त्यांनी हा मान आतापर्यंत तीनदा सलग टिकवून ठेवला. पुन्हा 2024ला त्या महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत.आता त्या खासदारकीचा चौकार मारतात की तो महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या तो हुकवितात याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com