रांजणगावात पाचुंदकर कुटुंबीयांचा धुव्वा़; श्रीमंत ग्रामपंचायतींची सूत्रे खेडकरांकडे

रांजणगावात पाचुंदकर कुटुंबीयांचा धुव्वा़; श्रीमंत ग्रामपंचायतींची सूत्रे खेडकरांकडे

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर कुटुंबियांची गेली १० वर्षाची ग्रांमपंचायतीची सत्ता मतदारांनी उलथून टाकली असून ग्रांमपंचायतीमध्ये श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा निवडून आले.

श्री मंगलमूर्ती पॅनेलचे उमेदवार सर्जेराव बबन खेडकर यांनी महागणपती पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय आनंदराव पाचुंदकर यांचा पराभव करून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. सहा प्रभागात १७ जागांसाठी झालेल्या सदस्यांच्या निडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. ५५८६ मतदानापैकी ४८९२ इतके एकूण मतदान झाले.सरपंचपदासाठी सर्जेराव खेडकर यांना २४४१ मते आणि दत्तात्रय पाचुंदकर यांना २४२५ मते मिळाली. १७ मतांनी श्री खेडकर विजयी झाले आहेत.

रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रेय पाचुंदकर यांना सरपंचपदावर पराभव स्वीकारावा लागला आहे.तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांची मातोश्री लक्ष्मीबाई पाचुंदकर यांनाही या निवडणुकीत सदस्य पदासाठी हार पत्करावी लागली आहे.जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनेलला मोठी हार पत्करावी लागली.

यामध्ये फक्त अर्चना पाचुंदकर यांना विजय मिळाला आहे.येथील सरपंचपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने कुणबी फॅक्टरला मतदारांनी साफ नाकारल्याची चर्चा गावात आहे. तसेच गेली १० वर्षे सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱयांनी गावाचा विकास केलेला मतदारांना महत्वाचा वाटला नसून परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱयांना धक्का दिला आहे.

येथील ग्रांमपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून मोठी आर्थिक उलाढाल झाली असली तरी सत्ताधाऱयांच्या विरोधी मतदारांनी अनपेक्षित लाट निर्माण करून विरोधकांच्या हाती निर्विवाद सत्ता दिली आहे. मंगलमूर्ती पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर,माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर आदींनी केले. निवडणुकीनंतर श्री. खेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला.

प्रभागानुसार प्रथम विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

प्रभाग एक - (दोन जागा) हिराबाई पंढरीनाथ खेडकर (३९३,विजयी), निता नितीन खेडकर (३४५ पराभूत)/आनंदा तुकाराम खेडकर (४२५ विजयी),निलेश सुरेश खेडकर (३१८ पराभूत).

प्रभाग दोन -(तीन जागा) विलास बाळासाहेब अडसूळ (५५२ विजयी),हिराबाई नारायण शेलार (४४३ पराभूत)/अजय तुकाराम गलांडे ( ६०२ विजयी), मोहन आत्माराम शेळके (४२६ पराभूत), निलम श्रीकांत पाचुंदकर (६६२ विजयी),लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर (३६१ पराभूत).

प्रभाग तीन- (तीन जागा) धनंजय विठ्ठल पवार (५१२ विजयी ),गणेश भगवंत लांडे (३०३ पराभूत)/ मिनाक्षी दिलीप लांडे (३४० विजयी),सुजाता पंडीत लांडे (४१८ पराभूत), सरेखा प्रकाश लांडे (४७९ विजयी),शोभा रमेश शेळके (३९४ पराभूत).

प्रभाग चार - (तीन जागा) स्वाती भानुदास शेळके ( २७४ विजयी),वैशाली प्रकाश शेळके (२३९ पराभूत)/ बाबासो धोंडिबा लांडे (२५८ विजयी),नवनाथ विलास लांडे (२५४ पराभूत).सुप्रीया योगेश लांडे (२६९ विजयी),शोभा सूर्यकांत लांडे (२४४ पराभूत).

प्रभाग क्रमांक पाच - (तीन जागा) रंभा माणिक फंड (४३८ विजयी),रंजना महादू फंड (४२९ पराभूत)/ राहूल अनिल पवार ( ४७२ विजयी), अनिल बाळासो दुंडे (४०२ पराभूत), अनिता सुदाम कुटे (४९० विजयी),शुभांगी योगेश पाचुंदकर (३७६ पराभूत).

प्रभाग क्रमांक सहा- (जागा तीन) संपत गणपत खेडकर (५१२ विजयी),रामदास परशुराम खेडकर (३७७ पराभूत)/आकाश संजय बत्ते (५५१ विजयी),बबन आनंदराव बत्ते (३३३ पराभूत), अर्चना संदिप पाचुंदकर (४४९ विजयी),अलका संभाजी गदादे (४४० पराभूत).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com