Parth Pawar: पार्थ पवार दोन तासांत फैसला करणार: मावळ की शिरुरमधून लोकसभेत एन्ट्री करणार?

Pune Politics : पुण्यात गाठीभेटीचा सपाटा लावला आहे.
Parth Pawar
Parth PawarSarkarnama

Pune: जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून पक्ष संघटना आणि चिन्हावरच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पारडे जड केले. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'बाहुबली' ठरलेले अजितदादा आता नव्या दमाच्या नेत्यांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात असून, पुण्यात 'युवा मिशन' भरवून ते तरुण नेत्यांची परीक्षाच घेणार असल्याचे दिसत आहे.

'युवा मिशन'मध्ये पार्थ पवार आज सकाळी ११ वाजण्यच्या सुमारास भाषण करतील. त्यात ते शिरुर की मावळमधून लढणार, याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते लोकसभेची निवडणूक लढणार का, तसे झाल्यास ती कोठून याचा फैसला दुपारी दोन वाजेपर्यंत होऊ शकतो.

अजितदादांच्या नजरेत आपली कामगिरी उतरविण्याच्या हेतुने नव्या राष्ट्रवादीतील युवक नेत्यांची फळी आपापल्या ताकदीवर गर्दी जमवून 'शक्ती' दाखवणार आहेत. या मिशनला युवा नेते पार्थ पवारांनीही 'पॉवर' दिल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पार्थ पवारांनी लक्ष घातलेल्या पुण्यातील 'मिशन'कडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार हे पक्के आहे. विशेष म्हणजे, या 'मिशन'मधून पार्थ पवार भाषण ठोकणार का याची उत्सुकता तर आहेच; त्यापलीकडे जाऊन पुढच्या निवडणुकीच्या म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने थेट काही बोलणार का, हेही पाहावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 'युवा मिशन' मध्ये पार्थ पवारांची कुठच्या भूमिकेतून पुढे येतील, हेही पुढच्या काही तासांत दिसून येईन.

राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी व्यूहरचना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ नेतृत्वासोबत दोन हात करीत, अजितदादांनी निवडणूक आयोगातून पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे खेचून आणले. त्यावरून राष्ट्रवादीच्याच दोन गटात अजूनही संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे, जुन्या नेतृत्वाविरोधात लढा देत असतानाच अजितदादांनी आपल्या ताब्यात आलेल्या राष्ट्रवादी बळकट करण्याची व्यूहरचना आखली आहे. काही दिवसांआधी मुंबई महिला आघाडीचा मेळावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निकाला नंतर आता पहिल्यांदाच पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात 'युवा मिशन' भरून तरुण नेत्यांना ताकद देण्याची नीती अजितदादांच्या नेतृत्वात सुरू आहे.

नेत्यांशी जवळीक

अजितदादांच्या बंडापासून पार्थ पवारांनी पुण्यात गाठीभेटीचा सपाटा लावला आहे. आठवड्यातून किमान दोन दिवस तरी ते निरनिराळ्या कामांसाठी पुण्यात थांबत आहे. त्यातून स्व:पक्षासह इतर पक्षातील नेत्यांशी जवळीक निर्माण करण्याची एकही संधी पार्थ पवार सोडत नसल्याचे दिसत आहेत.

Parth Pawar
Uddhav Thackeray: भाजपचा बडा मासा ठाकरे गटाच्या गळाला; आज मेगा भरती

राजकीय दिशा निश्चित...

पहिल्या टप्प्यात पार्थ पवारांनी हडपसरमधील नेत्यांच्या भेटी घेतल्याने ते शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचे अंदाज बांधले गेले. त्यानंतरच्या काही दिवसांत त्यांनी पुण्यातील पेठांसह कोथरुडमधील नेत्यांकडे गेल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, भाजपचे वर्चस्व वाढत असलेल्या पुण्यात पार्थ पवारांनी फारच लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ते नेमके कोठून लढणार, याचा गोंधळ वाढला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात रोजच उत्सुकता असते. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या युवा मिशनमध्ये पार्थ पवार जोरदार भाषण ठोकून आपली राजकीय दिशा निश्चित करण्याची आशा पक्षाच्या युवा नेत्यांना असावी. त्यामुळेही या मिशनकडे पाहिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या मिशनला राज्यभरातील युवा नेत्यांची गर्दी राहणार असून, त्यासाठी खुद्द अजितदादांसह इतर नेतेही हजेरी लावणार आहेत. निवडणुकांचा विचार करून गेल्या काही दिवसांपासून अजितदादांनी पुण्यातील बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात लक्ष घातल्याचे त्यांचे दौरे, त्यातही विकासकामांचे उद्धघाटने, बैठकांवरून दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com