Indapur Politic's : हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जिल्हाध्यक्षांचे मोठे विधान; इंदापुरात ऑगस्टमध्ये होणार मोठी घोषणा

BJP Melava : विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या काळात इंदापुरातील नेत्याने अचानक पक्ष बदलला. मात्र स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप टिकवला. माने यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठा प्रमाणात फायदा होणार आहे.
BJP Indapur Melava
BJP Indapur MelavaSarkarnama
Published on
Updated on

Indapur, 07 July : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर दक्षिण विभागाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. माने यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार असून त्यात मोठी घोषणा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊनच त्याबाबत आपण भाष्य करू, असेही वढणे यांनी स्पष्ट केले, त्यामुळे ती घोषणा काय, अशी चर्चा इंदापूरच्या राजकारणात रंगली आहे.

दरम्यान, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे, त्याबाबत जिल्हाध्यक्ष वढणे यांनी त्याबाबत आम्हाला कोणताही निरोप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या काळात इंदापुरातील नेत्याने अचानक पक्ष बदलला. मात्र स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप टिकवला. माने यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठा प्रमाणात फायदा होणार आहे.

कार्यकर्त्यांनी नवा व जुना हा भेदभाव इथेच सोडून द्यावा. कार्यकर्त्यांनी हातात हात घालून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. तालुका पातळीवरील प्रश्न वरिष्ठांच्या माध्यमातून सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यापुढच्या सर्व निवडणुकीत भाजपचा (BJP) उमेदवार उभा असेल, असेही वढणे यांनी स्पष्ट केले.

माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. ते भाजपध्ये प्रवेश करतील की नाही, याबाबत आमच्यापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही, असेही जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले.

प्रवीण माने म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचाही प्रचंड आग्रह हेाता, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही योग्य ट्रॅकवर आला आहात,’ असे सांगून प्रलंबित प्रश्न सोडवावेत, असे आवाहन केले.

मयूरसिंह पाटलांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी आमच्यापुढे भाजपशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे स्पष्ट केले. तसेच, कर्मयोगी आणि नीरा भीमा कारखान्यांनी उसाचे बिल अजूनही दिलेली नाही. त्यासाठी मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com