पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत

मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अमंली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.
पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना अमंली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.तीन आठवड्यांपूर्वी शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला यालाही अटक करण्यात आली आहे.

पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येला ओहोटी

या प्रकरणावर बोट ठेवत मलिक एनसीबीचे आधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधाप पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाया पूर्वग्रहदुषित असल्याचे सांगत आहेत.मलिक यांच्या जावयांकडे गांजा नव्हता. ती तर हर्बल तंबाखू होती, असे मलिक यांनी म्हटले होते. त्याचा आधार घेत शरद पवार यांनीही हर्बल तंबाखू असल्याचे म्हटले होते.त्याची दखल घेत माजी मंत्री खोत यांनी शेतकऱ्यांना अशा हर्बल तंबाखूच्या शेतीची परवानगी पवार यांनी मिळवून दिली तर राज्यातील शेतकरी श्रीमंत होतील. त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही, असे म्हटले आहे.

पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत
पुणे महापालिका निवडणुकीकडे अमित शहांचे आहे लक्ष

या आशयाचे पत्र खोत यांनी ज्येष्ठ नेते पवार यांना पाठविले आहे. ते पत्र पुढीलप्रमाणे

प्रति,

मा.खा.शरद पवारसाहेब

यांना सप्रेम नमस्कार,

विषय: हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत.....

माननीय महोदय,

आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे.कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे.आपल्या सारखे शेतीतील जाणते गुरु असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत.शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.

सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे.गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे.म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील श्री अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्यांने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे.राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे.पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते.जी सहजासहजी मिळत नाही.पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडी साठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी.जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल.

आपला,

सदाभाऊ खोत.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com