भाजपला आठवडाभरात तिसरा धक्का! फडणवीसांनी लक्ष घालूनही गळती थांबेना

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठी गळती लागली असून, तीन जणांनी पक्षाला रामराम केला आहे.
BJP Corporator Tushar Kamthe resigns
BJP Corporator Tushar Kamthe resigns Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये भाजपला मोठी गळती लागली आहे. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला (BJP) पिंपरी-चिंचवडमध्ये हा तिसरा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न करूनही गळती थांबत नसल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपचे पिंपळे निलख प्रभागातील नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी काही दिवसापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या नगसेविका चंदा लोखंडे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यामुळे कामठे यांच्या रुपाने भाजपला तिसरा धक्का बसला आहे.

BJP Corporator Tushar Kamthe resigns
फडणवीस यांच्या विरोधातील 'त्या' तक्रारीची मिटकरींनी करुन दिली आठवण

पिंपरी-चिंचवड भाजपमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. भाजपमध्ये नागरिकांची विकास कामे करण्यात अनेक अडचणी येत असल्याने आम्ही पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Elections) पक्ष सोडून जाऊ नये, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपमधील काही नाराज नगरसेवकांना केली होती. नाराज नगरसेवकांना त्यांनी स्वतः फोन करून ही विनंती केली, अशी विश्‍वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील जवळपास पंधरा-सोळा नाराज नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PCMC BJP Corporator Resigns)

BJP Corporator Tushar Kamthe resigns
रशियाचे आक्रमण महागात पडणार अन् निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेलचा भडका!

दरम्यान, वसंत बोराटे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बोराटेंचा प्रवेश झाला होता. राजकीय दबावाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आक्षेप घेत भोसरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बोराटे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ते नगरसेवक असलेल्या मोशी भागातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तसेच. ते नगरसेवक असलेल्या वॉर्डातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये अस्वस्था वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com