PCMC Election : एका भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीची झोपच उडाली : अजितदादांनी स्वतः मैदानात उतरून लावली यंत्रणा

PCMC Election : प्रवीण भालेकरांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी सावध झाली आहे. अजित पवार स्वतः प्रभागनिहाय उमेदवारीचा आढावा घेत शहरातील स्थानिक नेत्यांशी थेट चर्चा करत आहेत.
Former NCP corporator Pravin Bhalekar after joining BJP, Ajit Pawar taking strategic review within the party.
Former NCP corporator Pravin Bhalekar after joining BJP, Ajit Pawar taking strategic review within the party.Sarkarnama
Published on
Updated on

- प्रदीप लोखंडे :

PCMC Election : मागील काही दिवसांपासून शांत भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मैदानात उतरून अंतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. हा सर्व्हे आगामी काळात सक्षम उमेदवार शोधण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिवाय ज्‍या प्रभागात सक्षम उमेदवार नाहीत, तिथे भाजपमधील नाराज अथवा नवख्या, पण बलाढ्य उमेदवाराचा पर्याय पक्षाकडून शोधला जात आहे. ऐन निवडणुकीत पक्षाकडून धक्‍कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्‍यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत.

प्रभाग क्रमांक 12 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्‍या प्रभागात राष्ट्रवादी इतर उमेदवाराला तिकीट देणार असल्याची कुणकुण त्यांना लागली होती. त्‍यामुळे भालेकर यांनी भाजपला प्राधान्‍य दिल्‍याचे सांगितले जाते. या एका प्रवेशाने राष्ट्रवादीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडूनही प्रत्‍येक प्रभागाचा आढावा घेतला जात आहे. शहरातील स्‍थानिक लोकप्रतिनिधींशी उमेदवारीविषयी अजित पवार स्‍वतः थेट चर्चा करत आहेत.

दुसरीकडे पवार यांनी स्‍वतः 2-3 टप्‍प्‍यांत अंतर्गत सर्व्हे सुरू केला आहे. ‘‘महापालिका निवडणुकीच्या या सर्व्हेमध्ये प्रभागाची राजकीय स्‍थिती, मतदार संख्या, प्रभाव असलेले लोकप्रतिनिधी, प्रलंबित प्रश्‍न आदींचा मागोवा घेतला जात आहेतच. मात्र, इतर पक्षांतील नाराज पदाधिकारी, नवीन लोकप्रतिनिधी यांचाही शोध घेतला जात आहे. त्‍यांची माहिती जमवून पक्षाकडे सोपविली जाणार आहे. त्‍यावरुन उमेदवार कोण, याचा निर्णय स्‍वतः अजित पवार घेतील, ’’ असे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Former NCP corporator Pravin Bhalekar after joining BJP, Ajit Pawar taking strategic review within the party.
PCMC Election : भाजपचे 4 आमदार... चौघांनी तयार केला स्वतःचा गट : महामंत्र्यांनी 2 वाक्यातच प्रदेशाध्यक्षांसमोर काढले वाभाडे

उपमुख्यमंत्र्यांचा प्रत्‍यक्ष संवाद :

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी इच्‍छुक उमेदवारांशी स्‍वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपर्क करून चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्षम उमेदवार मिळतील, याची खबरदारी ते घेत आहेत. यासाठी आपल्‍या लोकप्रतिनिधींच्‍या सर्व्हेच्या माहितीचा आधार घेत स्‍वतः ही खात्री करून घेण्यावर भर देत असल्‍याची चर्चा आहे.

Former NCP corporator Pravin Bhalekar after joining BJP, Ajit Pawar taking strategic review within the party.
PCMC Election : भाजपला भिडण्यासाठी 'राष्ट्रवादीं'चे एकत्र मनसुबे : पिंपरी-चिंचवडचे दोन्ही शहराध्यक्ष लागले कामाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, पक्षाकडे प्रत्‍येक प्रभागात सक्षम प्रतिनिधी आहेत. उमेदवारीबाबत आमची चाचपणी सुरू आहे. इतर पक्षांतील अनेक इच्‍छुक आमच्‍याकडे येऊ शकतात. मात्र, त्याविषयी नंतर बोलणे योग्य ठरेल. याबाबत सर्वस्‍वी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com