Pimpri-Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळारी पुण्यात येत आहेत. यावेळी ते पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत. त्यात पिंपरी महापालिकेच्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या राज्यातील अशा पहिल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचाही समावेश आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहरातील कचऱ्याचे डोंगर दिसणार नाहीत. तसेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणार असल्याने शहरातील वीजेचा प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
'वेस्ट टू एनर्जी' या बहूचर्चित आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालेल्या प्रकल्पासह पंतप्रधान आवास योजनेच्या पिंपरी पालिकेच्या एका प्रकल्पातील घरवाटप, तर दुसऱ्याचे भुमीपूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत. उदघाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी दिली आहे.
प्रकल्पाबाबत बोलताना शेखरसिंह म्हणाले, "शहरात दररोज साडेअकराशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातील आता सातशे टन सुक्या कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. वीज बनविणाऱ्या ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड या मुंबईतील कंपनीकडून पालिका ती पाच रुपये युनीटने विकत घेणार आहे. महावितरणपेक्षा ती स्वस्त असल्याने पालिकेच्या वार्षिक वीज बिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत (२० कोटी रुपयांची) होणार आहे", असाही दावा आयुक्तांनी केला आहे.
"कचऱ्यापासून आता वीज तयार करण्यात येणार असल्याने शहराच्या मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर दीड वर्षात सपाट होतील. तसेच नव्याने कचरा डेपोसाठी जागा शोधायची वेळ येणार नाही", असेही शेखरसिंहांनी यावेळी स्पष्ट केले.
'डीबीओटी' तत्वावर 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'नुसार विकसित केलेला हा प्रकल्प ठेकेदार ऍन्थोनी कंपनीला २१ वर्षे चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
कर्जरोख्यावर काय म्हणाले आयुक्त ?
नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेने दोनशे कोटी रुपयांचा निधी हा कर्जरोख्यांतून उभारला. त्यानंतर त्यावर आर्थिक स्थिती ढासळल्याने कर्जरोख्यातून निधी उभारण्याची पाळी श्रीमंत पालिकेवर आल्याची टीका सुरु झाली आहे. पण, ती चुकीची असल्याचे आयुक्तांनी `सरकारनामा`शी बोलताना स्पष्ट केले.आपल्यापेक्षा श्रीमंत व मोठ्या मुंबई पालिकेनेसुद्धा कर्जरोख्यातून निधी उभारला आहे. तसेच जगातील सर्वात श्रीमंत न्यूयार्क महापालिकाही त्याला अपवाद नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्थानिक विकासकामांसाठी हा निधी आवश्यक असून पालिकेची मोठी पत असल्यानेच या कर्जरोख्यांना दीडपट प्रतिसाद मिळाल्य़ाचे त्यांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.