थकित ‘एफआरपी’साठी स्वाभीमानी शेतकरी संघटना जाणार सर्वोच्च न्यायालयात

राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांनी ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीचे सुमारे एक हजार कोटी रूपये थकविले आहेत
sar41.jpg
sar41.jpg
Published on
Updated on

पुणे : राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांनी ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीचे सुमारे एक हजार कोटी रूपये थकविले आहेत. या कारखान्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

पुण्यात बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘ एफआरपी देण्याबाबत कारखाने उदासीन आहेत. ‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांची संख्या राज्यात तुलनेने कमी असली तरी सुमारे एक हजार कोटी रूपयांची शेतकऱ्यांची बिले या कारखान्यांकडे अडकली आहेत. यातील बहुतांश कारखाने बंद पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना बिले मिळणे आणखी अवघड झाले आहे. देशातील इतर राज्यात अशा थकित बिलांचा आकडा सुमारे २५ हजार कोठी रूपये असू शकतो असे शेट्टी यांनी सांगितले.’’

राज्यात विशिष्ट कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, अशी कारवाई राज्य सरकारकडून याआधीच होणे अपेक्षित होती. मात्र, राज्य सरकार कोणतीच कारवाई होत नसल्याने थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग स्वीकारण्यात येत आहे. राज्यासह देशभरातील इतर राज्यामध्येदेखील हा प्रश्‍न गंभीर असल्याने थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच काळात उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात घातक स्फोटके सापडतात.हा प्रकार म्हणजे उद्योगपतींच्या जीवाला धोका आहे असा अभास निर्माण करण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून उद्योगपतींना सहानुभूती मिळविण्याचा हेतू असू शकतो, असे शेट्टी यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनाच्या पाश्‍र्वभूमीवर अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून जाणीवपूर्वक केला जात असावा, अशी दाट शक्यता वाटते, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
Edited by : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com