पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण सोडतीने विद्यमान २५ नगरसेवकांचा पत्ता कट; गाववाल्यांची कोंडी

Pimpari-chinchwad | चिंचवड व भोसरी या भाजप आमदारांच्या मतदारसंघातील प्रभागांमध्ये पुरुष इच्छुकांची मोठी कोंडी
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpari-chinchwad) महापालिका निवडणुकीची ओबीसीविना आरक्षणाची सोडत सोमवारी (ता.३१) काढण्यात आली. त्यामुळे किमान महिला इच्छुकांच्या तयारीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या आरक्षणामुळे गत टर्ममधील २५ पुरुष नगरसेवकांच्या जागा महिला आरक्षण पडल्याने त्यांना मोठा धक्का बसला असून एक तर त्यांना घरी बसावे लागणार आहे किंवा पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे. तर, या सोडतीमुळे गाववाल्यांची मोठी कोंडी झाली असून विविध पक्षांचे स्थानिक २०२२ ला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. (Pimpari-chinchwad Latest news)

पिंपरी पालिकेत २०१७ ला १२८ जागा, तर चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. २०२२ ला ही संख्या अनुक्रमे १३९ आणि ४६ झाली आहे. १३९ पैकी ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत. यावेळी ओबीसी आरक्षण नाही. प्रत्येक प्रभागात एकेक जागा खुली आहे. २५ प्रभागात एससी व एसटी आरक्षण आहे. तेथील महिला आरक्षणासह (११ एससी व दोन एसटी) इतर प्रभागातील सर्वसाधारण महिलांच्या जागा (५७) आज निश्चीत करण्यात आल्या. शाळकरी मुलांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.

शहरातील चिंचवड व भोसरी या भाजप आमदारांच्या मतदारसंघातील काही प्रभागात स्थानिक पुरुष इच्छुकांची या मोठी कोंडी आरक्षणामुळे झाली आहे. कारण तेथे तीनपैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्याने याअगोदर तेथे असलेल्या दोनपेक्षा अधिक पुरुष नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना शिल्लक एका जागेसाठी तीव्र स्पर्धा करावी लागेल किंवा शेजारच्या प्रभागात घुसखोरी करावी लागेल. एवढेच नाही, तर निवडून येण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण प्रभागातील तीनपैकी एकाच खुल्या जागेवर दिग्गज स्थानिकांच्या उड्या पडणार आहेत.

प्रभागांनुसार आरक्षण

  • अनुसूचित जाती

वर्णन / महिलांसाठी आरक्षित प्रभाग / खुला
एकूण जागा २२; महिलांसाठी ११ / अ जागा प्रभाग ११, १४, १८, १९, २०, २४, ३४, ३५, ३७, ४१, ४३ / अ जागा प्रभाग २, १६, १७, २२, २५, २९, ३२, ३८, ३९, ४४, ४६
(खुल्या अकरा जागांवर एससी महिला व पुरुष निवडणूक लढवू शकतात)

  • अनुसूचित जमाती

वर्णन / महिलांसाठी आरक्षित प्रभाग / खुला
एकूण जागा ३; महिलांसाठी २ / ब जागा प्रभाग ४१, ४४ / अ जागा प्रभाग ६
(खुल्या एका जागेवर एसटी महिला व पुरुष निवडणूक लढवू शकतात)

  • सर्वसाधारण

वर्णन / महिला / खुला
एकूण जागा ११४; महिलांसाठी ५७ / अ जागा प्रभाग १, ३, ४, ५, ७, ८, ९, १०, १२, १३, १५, २१, २३, २६, २७, २८, ३०, ३१, ३३, ३६, ४०, ४२, ४५; ब जागा प्रभाग १, २, ६, ७, ८, ११, १२, १३, १४, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २४, २५, २७, २९, ३०, ३१, ३२, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४२, ४३, ४६; क जागा प्रभाग ४६ / प्रभाग एक ते ४५ मधील क आणि प्रभाग ४६ मधील ड जागा
(सर्वसाधारण खुल्या ४६ जागांवर एससी, एसटीसह सर्वसाधारण महिला व पुरुषही निवडणूक लढवू शकतात)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com