काँग्रेस होणार आक्रमक; नव्या शहराध्यक्षांना नानांचा आदेश

आगामी पालिका निवडणुकीबाबत पटोलेंनी मार्गदर्शक सूचना यावेळी केल्या
Nana Patole
Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : कॉंग्रेस (Congress) राज्यात सत्तेत असली, तरी तिची अवस्था पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षात दयनीय झालेली आहे. पिंपरी महापालिकेत २००२ ला सत्तेत असलेल्या या पक्षाचा सध्या शहरात एकही नगरसेवक नाही. त्यामुळे पहिली संघटनाबांधणी जोमाने करा. त्यासाठी चुकीच्या कामाविरोधात, नागरिकांच्या प्रश्नांवर आणि स्थानिक मुद्यांवर आवाज उठवा. असे पक्षाचे आक्रमक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यासारखीच प्रकृती असलेले पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांना सोमवारी (ता.१८) सांगितले.

Nana Patole
खतगावकर आले, अजूनही बरेच येणार ; शंकररावांच्या काळातील काॅंग्रेस पुन्हा उभारू

दरम्यान, दिवाळीपूर्वी वा त्यानंतर पिंपरीचा दौरा करण्याचा शब्दही पटोलेंनी दिल्याचे डॉ. कदम यांनी या भेटीनंतर 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन काम करा, असा मंत्र प्रदेशाध्यक्षांनी दिला असल्याचे ते म्हणाले. स्थानिक मुद्यांवर आवाज उठवून पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळेल, असे काम करा. असेही त्यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. प्रांताध्यक्षांसमवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर, आगामी पालिका निवडणुकीबाबत पटोलेंनी मार्गदर्शक सूचना यावेळी केल्या. शहरात काँग्रेस वाढीसाठी विशेष तंत्रे समजावून सांगितली. शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला. तर, पालिका निवडणुकीत उत्तम यश मिळविण्याबाबतची आपली तयारी व नियोजन याबाबत कदम यांनी त्यांना माहीती दिली.

Nana Patole
निवडणुकीच्या तोंडावर भाजप तोंडघशी; आश्वासन पाळता आले नाही

या महिन्यात ७ तारखेला कदम यांची शहराध्यक्षपदी नेमणूक झाली. दरम्यान, उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थचा आघाडीचा राज्य बंद झाला. दुसरीकडे प्रदेशाध्यक्षही मुंबईत नव्हते. त्यामुळे कार्यभार घेण्यास जसा त्यांना थोडा उशीर झाला. तसाच तो प्रदेशाध्यक्षांची भेट घेण्यासही झाला. दरम्यान, पटोले हे मुंबईत येताच लगेच कदम हे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पक्षाचे प्रदेश सदस्य अमित मेश्राम, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे त्यांच्याबरोबर होते. नव्या जबाबदारीबद्दल कदम यांनी पटोलेंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com