Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांनी आपापली बांधणी नव्याने सुरू केली आहे. त्यातून त्यांच्यात संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार) पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या महाराष्ट्राभिमान युवक मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला. त्यात गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणून दाखवण्याचे आव्हान अजित पवार यांनाच थेट देण्यात आले.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या नेतृत्वात पिंपळे गुरव या भाजपच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा झाला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यात अजितदादांनाच ललकारले. ते राष्ट्रवादीत असताना वाघ होते. मात्र, भाजपची साथ धरल्यापासून त्यांना निर्णय घेण्यात रोखले जाताना दिसते आहे. दादा, खरंच आपल्या कामात वाघ असतील, तर पुणे जिल्ह्यातील वेदांता-फोक्सकॉन, टाटा-एअरबस यासारखे अनेक प्रकल्प गुजरातला नरेंद्र मोदींनी नेले. ते त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात आणावेत, जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, असे शेख म्हणाले. मेळाव्यापूर्वी युवकांची दुचाकी रॅली काढून शरद पवार गटाने शक्तिप्रदर्शन केले.
शरद पवारसाहेबांनी पक्षाच्या अनेक नेत्यांना घडवले, मोठे केले. अगदी पीए दिलीप वळसे पाटलांना गृहमंत्री केले. ज्यांना मुंबईतून निवडून येता येत नाही, अशा भुजबळांना नाशिकमधून निवडून आणून राज्याचे उपमुख्यमंत्री केले. ज्यांना आपल्या मतदारसंघात निवडून येणेही शक्य नव्हते, त्या प्रफुल्ल पटेलांना दोन टर्म राज्यसभा दिली, मंत्री केले, अशी लोकं पवारसाहेबांना ते हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात, असे निवडणूक आयोगात सांगतात, त्यांना खरंतर लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल मेहबूब शेख यांनी केला. आगामी महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के उमेदवारी ही युवक, युवतींना देण्याची मागणी इम्रान शेख यांनी केली. पक्षाचे वीस-पंचवीस नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.