गावडेंनी उंचावली PCMC ची मान, मिळवून दिला राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकाचा बहूमान

प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) देशातील ४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदक’ जाहीर केले आहे.
Kiran Gavde
Kiran GavdeSarkarnama

पिंपरी : प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) मंगळवारी (ता.२५ जानेवारी) उल्लेखनीय सेवेसाठी अग्निशमन दलाच्या देशातील ४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सातजणांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC Fire Brigade) मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे (Kiran Gavde) यांनी शहराला प्रथमच हा बहूमान मिळवून दिला आहे. कारण त्यांच्या रुपाने शहराला प्रथमच राष्ट्पतींचे अग्निशमन पदक मिळाले आहे.

Kiran Gavde
महाराष्ट्राला आहे अभिमान : 26 जानेवारीच्या पदकांत 51 पोलिस व अधिकारी

अग्निशमन सेवेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला मिळालेल्या सात पदकांत दोन राष्ट्रपती सेवा पदके, तर पाच 'अग्निशमन सेवा पदक' आहेत. बाळू देशमुख यांना मरणोत्तर 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' तर, पुणे महापालिकेचेमुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना 'अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहेत. त्यात गावडे तसेच, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हामूनकर व अग्निशमक जवान चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे. देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये १ 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक', शौर्यासाठी २ 'अग्निशमन सेवा पदक', विशिष्ट सेवेसाठी ९ 'राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक' आणि उत्कृष्ट सेवेसाठी ३० 'अग्निशमन सेवा पदक' जाहीर झाले आहेत.

Kiran Gavde
३२ नंबरच्या मंत्रिपदावरुन पंकजांनी धनंजय मुंडेंना पुन्हा डिवचले! म्हणाल्या...

गावडे यांची ३४ वर्षे सेवा झाली आहे. ते १९८७ मध्ये स्टेशन ऑफिसर म्हणून थेट भरती झाले. तर, २०१६ ला उपमुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांचे प्रमोशन झाले. २०१९ ला ते मुख्य अग्निशमन अधिकारी बनले. अग्निशमन दलाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी शहरात चार नवी अग्निशमन केंद्रे सुरु केली. आणखी चार प्रस्तावित आहेत. तर, त्यांच्याच पाठपुराव्यामुळे लवकरच शहरातील आग विझवण्याच्या बंबांच्या मदतीला आग विझवणाऱ्या तीन दुचाकी तथा बाईक सामील होणार आहेत. गेल्या आठवड्यातच पालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. १९९९ साली अग्निशमन विभागाचे ४५ लाख रुपये असलेले उत्पन्न त्यांनी २०२१-२२ मध्ये दीड कोटी रुपयांवर नेले आहे. कोरोना काळात त्यांनी शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करून तेथे आग लागणार नाही, याची दक्षता घेतली आहे. २००५, २००६ आणि २०१९ च्या शहरात आलेल्या महापूरात एकाचाही बळी त्यांनी जाऊ दिलेला नाही. राष्ट्रपती पदक मिळाल्याने अत्यानंद झाल्याची प्रतिक्रिया गावडेंनी 'सरकारनामाला' दिली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com