पिंपरी भाजपचा अजब कारभार; पेव्हींग बसविण्यासाठी पैसे मोजून घेणार सल्ला!

सहा कामांकरिता सल्लागार नेमणुकीस बिनबोभाट, विनाचर्चा काही मिनिटांत मंजुरी देण्यात आली.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या स्थापत्य विभागात लाख, दोन लाख पगार घेणारे कार्यकारी अभियंते आहेत. तरीही पेव्हिंग ब्लॉक बसवणे, शाळा बांधणे, रस्ता तयार करणे अशा साध्या व तांत्रिक सल्याची गरज नसलेल्या कामांसाठी सुद्धा सल्लागार नेमून करदात्यांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी पालिका करीत आहेत. गुरुवारच्या (ता.११) स्थायी समितीच्या बैठकीत सल्लागारांची गरज नसलेल्या ३४ कोटी रुपयांच्या खर्चाच्या सहा कामांकरिता सल्लागार नेमणुकीस बिनबोभाट, विनाचर्चा काही मिनिटांत मंजुरी देण्यात आली. सल्याची गरज नसलेल्या या कामांसाठी ३४ लाख रुपये पालिका सल्लागारांना मोजणार आहे.

सल्लागार नियुक्तीतून करदात्यांना दुहेरी फटका बसतो आहे. पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून अपेक्षित या कामांसाठी लाखो रुपये बिदागी घेणारे तज्ज्ञ सल्लागार गरज नसताना नेमले जात आहेत. दुसरीकडे हे काम स्थापत्य विभागाकडून होणे अपेक्षित आहे. तेथील तज्ज्ञ इंजिनिअर ते न करता फुकाचा लाखात पगार जनतेच्या पैशातून घेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षही या गरज नसलेल्या व लाखो रुपयांनी पालिकेला व पर्यायाने जनतेला खड्यात घालणाऱ्या सल्लागार नियुक्तीवर मूग गिळून गप्प का आहेत, हे विशेष. त्यातून टक्केवारीसाठी मध्यस्थ म्हणून हे सल्लागार नेमले जात आहेत, अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळाली आहे. दरम्यान, पालिकेच्या सल्लागार मंडळावरील काही सल्लागार बोगस निघाले आहेत. त्यांना आयुक्तांनी काळ्या यादीत टाकून काहींविरुद्ध फौजदारीही केली आहे.

PCMC
'पीएमआरडीए'च्या निवडणुकीत लांडगेंपेक्षा, जगतापांचे पारडे जड

दरम्यान, ही सल्लागार नियुक्ती आता बंद करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी आजची बैठक संपल्यानंतर सायंकाळी सांगितले. पालिका आयुक्तांना तसे सांगणार आहे, असे ते म्हणाले. शाळा बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामांसाठी सल्लागार नियुक्तीची गरज नसल्याचे त्यांचेही मत पडले. दरम्यान, आजच्या बैठकीत ७२ कोटी ६६ लाख ५१ हजार ६५८ रुपये खर्चाचे ३३ विषय मंजूर करण्यात आले. त्यातील सहा प्रस्ताव, तर फक्त सल्लागार नेमण्याचेच होते. त्यातील बोऱ्हाडेवाडी येथे सहा कोटी ९७ लाख ३५ हजार १७९ रुपये खर्चून शाळा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी मे. प्लॅनिटेक कन्सलटन्सी यांना सल्लागार म्हणून नेमण्यास आले आहे. हाच सल्लागार पालिकेला जास्त फेव्हरिट दिसतो आहे. कारण त्यांना आजच्याच बैठकीत आणखी दोन कामे देण्यात आली आहेत.

PCMC
डब्बल मोकातील आरोपी गायकवाडची फिर्यादीलाच फ्रेंड्स रिक्वेस्ट; तुरुंगातही मोबाईलचा वापर?

दोन कोटी तीन लाख ८६ हजार ४०७ रुपये खर्चाचा डीपी रस्ता विकसित करण्याच्या कामसाठीही सल्लागार म्हणून त्यांनाच नियुक्त केले गेले आहे. तर, नेहरुनगर येथे, तर जुनी शाळा पाडून नवी बांधण्याच्या एक कोटी ३९ लाख ४४ हजार दोनशे रुपये खर्च येणाऱ्या कामाकरिता दुसरा कोणी कन्सलटंट पालिकेला सापडलेला नाही. हे कामही मे. प्लॅनिटेकलाच दिले गेले आहे. १८ कोटी ५१ लाख ५४ हजार ३२८ रुपये खर्चाचा दुसरा एक रस्ता तयार करण्यासाठी मे. पेव्हटेक कन्सलटिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. या सल्लागार संस्थेची निवड केली गेली आहे. आणखी एक रस्ता तयार करण्याच्या ९८लाख ५६ हजार ३४२ रुपये खर्चाच्या कामासाठी मे. अश्युअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाव्या कामात, तर सल्लागार नियुक्त करण्याची अजिबात गरज नसतानाही तो नेमण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. शहरात पेव्हिग ब्लॉक, रस्ता दुभाजकाच्या चार कोटी १४ लाख ४८ हजार ८८९ रुपये खर्चाच्या कामासाठी मे. एन्व्हायरो सेफ कन्सलटंट नेमण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com