डब्बल मोकातील आरोपी गायकवाडची फिर्यादीलाच फ्रेंड्स रिक्वेस्ट; तुरुंगातही मोबाईलचा वापर?

पिंपरी-चिंचवड आणि पुणे अशा दोन्ही पोलिसांनी या टोळीविरुद्ध मोका लावलेला आहे.
 Ganesh Gaikwad
Ganesh Gaikwad sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : औंध, पुणे येथील उद्योगपती गायकवाड पितापुत्र हे डबल 'मोका'त येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तरीही त्यातील कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी असलेला गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) हा सोशल मिडियाचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. ज्या खंडणी, अपहरण, अवैध सावकारी, खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ते 'मोका'त तुरुंगात आहे. त्या गुन्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) फिर्यादी महेश काटे यांना गणेशच्या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट आली आहे. त्यामुळे ते घाबरून गेले असून त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांत याप्रकरणी नव्याने तक्रार दिली आहे.

गणेश गायकवाड हा येरवडा तुरुंगात असल्याने पुणे पोलिसांनी याबाबत तुरुंग प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे गणेशने कारागृहातून मोबाईलचा वापर केला की काय हे समजणार आहे. पण, त्यासाठी तुरुंगातील त्याच्या सेलची झडती घ्यावी लागणार आहे. दुसरी शक्यता अशी आहे की गणेशच्या फेसबुक अकाउंटचा तुरुंगाबाहेरील दुसरी व्यक्ती किंवा गणेशच्या सांगण्यावरून त्याचा बाहेरील साथीदार वापर करीत असल्याचीही शक्यता आहे. कालपर्यंत गणेशचे हे अकाउंट अॅक्टिव्ह होते, असे त्याबाबत तक्रार केलेले काटे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

 Ganesh Gaikwad
अभिनेत्री कंगनाच्या विरोधात पुण्यातही तक्रार

सध्या तुरुंगात असलेला गणेश गायकवाड हा सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असल्याचे काटे व दुसऱ्या फिर्यादी त्याची पत्नी यांच्या निदर्शनास आले. काटेंना नुकतीच गणेशच्या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट आली आहे. आरोपीने याआधी वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत काटे व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून बेकायदेशीर प्रलोभने, गर्भित धमक्या देऊन, दबाव टाकून सदर गुन्हे मागे घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्याबाबत पोलिस तक्रारी देऊनही त्यांच्याशी पुन्हा फेसबुकवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे विशेष. त्यामुळे ते घाबरून दडपणाखाली गेले आहेत.

आरोपी हे वेगवेगळ्या मार्गांनी कटकारस्थान रचून बेकायदेशीरपणे कुठल्यातरी प्रकरणामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती त्यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. आर्थिक व राजकीयदृष्ट्या आरोपी बलाढ्य असल्याने गुन्हे मागे घ्यावेत म्हणून ते आमच्यावर सूड उगविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवू शकतात. आमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, असे काटे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

 Ganesh Gaikwad
कंगना मूर्ख की देशद्रोही? भाजप खासदारानेच काढले वाभाडे

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ तसेच मुलगा गणेश आणि साथीदारांविरोधात खूनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवून नेणे, दुखापत करणे, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणी पद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्यात त्यांच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड आणि पुणे अशा दोन्ही पोलिसांनी या टोळीविरुद्ध मोका लावलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com