Pimpri-Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांना बाप्पा पावला; ३९४ कर्मचाऱ्यांना मिळालं मोठं 'गिफ्ट'

Promotion of Police : पिंपरी-चिंचवडच्या ३९४ पोलिसांचे झाले प्रमोशन
Pimpri-Chinchwad Police
Pimpri-Chinchwad PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या गणेशोत्सवासाठी इतर दिवसांपेक्षा अधिक ताण पोलिसांवर आहे. कारण सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने पोलिसांना बंदोबस्त लागलेला आहे. पण या गणेशोत्सव सणाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना गुड न्यूज मिळाली आहे. तब्बल ३९४ कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे. त्यामुळे पोलिसांना बाप्पाच पावले, अशी चर्चा पोलीस दलात रंगली आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

पोलीस शिपाई म्हणून भरती झालेला कर्मचारी हा अधिकारी म्हणजे पीएसआय म्हणू्नच रिटायर होईल, असा निर्णय राज्य सरकारने यावर्षी घेतला. मात्र, आतापर्यंत प्रमोशन मिळविताना पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत होती.

पीएसआय होण्यासाठी मध्ये तीन पदे (पोलीस नाईक, हवालदार, जमादार) पार करावी लागत होती. त्यासाठी कित्येक वर्षे जात होती. मात्र, यावर्षी वरील प्रमोशनचा निर्णय घेतानाच सरकारने पोलीस नाईक हे पद रद्द केले. त्यामुळे प्रमोशन मिळण्य़ातील पोलीस शिपायांचा पहिला अडथळा तथा टप्पा दूर झाला.

Pimpri-Chinchwad Police
Dhangar Reservation: मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडवर; बोलावली तातडीची बैठक

या पदावरील कर्मचारीच काल रात्री उशीरा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या सामूहिक प्रमोशनमध्ये अधिक संख्येने आहेत. पोलीस नाईक पद रद्द झाल्याने पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल आता थेट हवालदार झाले आहेत. तर, हवालदार हे पीएसआय बनले आहेत. चार एएसआय़ म्हणजे जमादारांना पीएसआयपदी बढती देण्यात आली आहे.

सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्याचा आदेश अॅडिशनल कमिशनर वसंत परदेशी यांनी पोलीस आयुक्तांच्यावतीने गुरुवारी रात्री काढला. त्यामुळे आज गणेश बंदोबस्तावर असलेल्या व हे प्रमोशन मिळालेल्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. १५ ऑगस्ट १९१८ रोजी स्थापन झालेल्या पिंपरी पोलीस आय़ुक्तालयाची ही पहिलीच मोठी प्रमोशन ऑर्डर ठरली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Pimpri-Chinchwad Police
Chandrapur Politics: वडेट्टीवारांच्या गावात मोठ्या घडामोडी; उपसरपंचपदासाठी भाजपची मोठी 'फिल्डिंग'; पण काँग्रेसने उधळला 'प्लॅन'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com