Assembly bypolls in Kasba and Chinchwad News : चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. दोन गटात धक्काबुक्की झाली. पिंपळे-गुरव येथील मतदान केंद्र ३४८ येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला आहे. येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.
पिंपळे गुरव येथील मतदान केंद्र ३४८ माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव येथून शंभर मीटरच्या अंतरावर भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर व गणेश जगताप यांच्यात 'तु माझ्याकडे का बघतोस,' म्हणून असे म्हणत धक्काबुक्की व बाचाबाची झाली.
या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान झाले. चिंचवडला पहिल्या चार तासांत फक्त १०.४५% मतदान झाले.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत.
मतदानाला आज सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली. कसब्यात दुहेरी, तर चिंचवडला तिरंगी लढत आहे. यात कोण बाजी मारणार हे दोन तारखेला समजणार आहे.
पिंपरी-गुरव येथील मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये प्रथम बाचाबाची व नंतर हाणामारी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
अश्विनी जगताप म्हणाल्या, मी नेहमी साहेबांना मतदान करायचे, आज मी स्वत:ला मतदान केले. थोडसं वेगळं वाटलं. दरवेळी साहेब असायचे, मी त्यांना मतदान करायचे, पण आज स्वत:ला मत देतेय, या भावनेने मनाला हुरहुर वाटली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिक माझ्या बाजूने आहेत, असा विश्वास राहुल कलाटे यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.