Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ कोटी रुपयांचा घोटाळा?

Prime Minister Awas Yojna : प्रशासकही भाजप नेत्यांच्या तालावर पिंपरीत निर्णय घेत असल्याचा राष्ट्रवादीचा हल्लाबोल
Pimpri News :
Pimpri News :Sarkarnama

Pimpri Chinchwad News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील घोटाळ्याप्रकरणी `ईडी` ने आज पाच ठिकाणी छापेमारी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेचेही या योजनेत जनतेच्या ३१ कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप करीत, त्याबाबत `ईडी`चौकशी करण्याची मागणी आज करण्यात आली.

Pimpri News :
Pune News : पुण्यात भाजप अन् 'आप'मध्ये जुंपली; मिळकतकराच्या मुद्यांवरून ट्विटरवॉर

पिंपरी पालिकेच्या या योजनेत ११९० घरांसाठी फक्त दोनच निविदा आल्याने त्यात ठेकेदारांनी रींग करुन संगनमत केल्याचे स्पष्ट दिसते आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. १४२ कोटींचे हे काम तब्बल ३१ कोटी रुपये जादा दराने १७३ कोटी ५८ लाख रुपयांना देण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, ती जनतेच्या पैशाची मोठी लूट आहे, असे ते म्हणाले.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच पिंपरीच्याही या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण `ईडी` कडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे आज केली.

Pimpri News :
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस लाच प्रकरणात नवा ट्विस्ट; बुकी जयसिंघानी अन् उद्धव ठाकरेंचं कनेक्शन?

बी.जी. शिर्केसारख्या नामवंत कंस्ट्रक्शन कंपन्या राज्यात असताना पिंपरी पालिकेच्या डु़डुळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत फक्त दोनच आणि त्याही गुजरातच्या ठेकेदारांनीच सहभागी होणे आणि त्यातील शांती कंन्ट्रक्शनला हे काम मिळणे हेच मुळी संशयास्पद असल्याचा दावा, गव्हाणेंनी केला आहे.

निविदा देताना स्पर्धा झालीच नाही, असे सांगत दोन्ही ठेकेदार कंपन्या अगदी ठरल्याप्रमाणे दर कोट करतात, हे खूप गंभीर आणि संशयास्पद आहे, असे ते म्हणाले. प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, हे संशयाला पुष्ठी देणारे आहे.

प्रशासकीय राजवटसुध्दा भाजप नेत्यांच्या तालावर निर्णय घेत असून ते ही या घोटाळ्यात सहभागी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.भाजप राजवटीत अशा प्रकारे बहुतांश प्रकल्पांच्या निविदा अव्वाच्या सव्वा जादा दराने आल्याची अनेक प्रकऱणे समोर आली आहेत,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com