मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन काल केला होता. फडणवीस हे पद स्वीकारण्यासाठी नाराज होते. त्यामुळे पंतप्रधानांनी फोन केल्याची चर्चा काल होती. मात्र ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी `साम`शी बोलताना दिले.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी फडणवीस हे नाराज होते. त्यांनी मंत्रीमंडळाबाहेर राहून सहकार्य करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर दोन तासांत पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून हे पद स्वीकारण्यास सांगितले, अशी चर्चा सुरू आहे.
यावर चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की अशा अफवा अनेक उडत असतात. मी स्वतः काल शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांना रिसीव्ह करण्यापासून होते. फडणवीस यांनी मंत्रीमंडळात यावे, अशी विनंती शिंदे यांनी केली. त्यावर फडणवीस यांनी केंद्राशी बोलून निर्णय केला. येथे असा आग्रह होत असल्याचे सांगितले. त्यावर पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिला.
याचा अर्थ पंतप्रधानांचा फोन आला नव्हता का, असा पुन्हा प्रश्न विचारल्यावर येथे अशा प्रकरचा आग्रह होत आहे. असे आमच्या श्रेष्ठींना सांगण्यात आले. त्यावर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी श्रेष्ठींनी त्यास मान्यता दिली, असे पाटील यांना सांगितले.
दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानं भाजप मध्ये नाराजी आहे, हे मान्य केले. ते म्हणाले की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून।उत्तम काम केले होते. फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसविले आहे. फडणवीस यांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र पक्ष नेतृत्वाने आग्रह केल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.
फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांची डिमोशन केल्याचे मत त्यांच्या समर्थकांचे आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना हे करायला लावले, असाही प्रवाद आहे. फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानून त्याग केल्याची भावना त्यांच्या समर्थकांची आहे. नागपूरमध्ये फडणवीस यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फ्लेक्सवर अमित शहा यांचा फोटो नसल्याने आणखीनच चर्चा सुरू झाली. त्यावर माजी महापौर संदीप जोशी यांनी पक्षाच्या प्रोटोकाॅलनुसार हे फोटो लावल्याचा दावा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.