PM Modi Pune Sabha Cancel: नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा पावसामुळे रद्द

PM Modi's Pune Visit Cancelled Due To Heavy Rains: एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती. त्याचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पीएमओकडून (PMO) देण्यात आली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा पावसामुळे रद्द (PM Narendra Modi Pune Visit Cancelled) करण्यात आला आहे. मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्धघाटन होणार होते. त्यांची एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार होती. त्याचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पीएमओकडून (PMO) देण्यात आली आहे. (PM Modi Pune Sabha Cancel)

मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज भूमीगत मार्गाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते आज होणार होते. अन्य विकास कामांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार होते. त्यासाठी भाजप आणि प्रशासनाने जोरदार तयारी केली होती.

गेल्या दोन दिवसापासून पुण्यात पाऊस सुरु असून हवामान विभागाने आजही पुण्याला आँरेंज अर्लट दिला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले. पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे 1 हजार 810 कोटी रुपये खर्च आला आहे.

PM Narendra Modi
Ajit Pawar Vs Eknath Shinde : मध्यरात्री अमित शहांशी चर्चा, 39 जागांसाठी अजित पवार, एकनाथ शिंदे भिडणार?

नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारे हे कार्यक्रम रद्द

  • सोलापूर विमानतळाचे उद्घाटन

  • ५०० ईव्ही चार्जिंग सुविधांचे लोकार्पण

  • द्रवरूप नैसर्गिक वायू – एलएनजीच्या २० स्थानकांचे लोकार्पण

  • बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण

  • तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण

  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील १० हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उदघाटन

  • ऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय एकाच किरकोळ विक्री केंद्रात पुरवण्यासाठी ऊर्जा स्थानकांचे उद्घाटन

  • ट्रक चालकांसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पंजाब मध्ये फतेहगढ साहिब, गुजरात मध्ये सोनगढ, आणि कर्नाटकमध्ये बेळगावी आणि बंगलोर ग्रामीण, या ठिकाणी महामार्गालगतच्या सुविधांचे उद्घाटन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com