"काँग्रेसच्या काळात प्रकल्पांच्या भूमिपूजनानंतर उद्घाटनाची वाट बघावी लागायची"

PM Narendra Modi | Pune | Live Update | Murlidhar Mohol : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जंगी सभा
PM Narendra Modi | Pune | Live Update
PM Narendra Modi | Pune | Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी आणि एकूणच या दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी केली गेली आहे. त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन या नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात.

  • "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या सर्वांना अभिवादन करतो" असे म्हणतं पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

  • भारताच्या स्वातंत्र्यात पुण्याचे ऐतिहासिक योगदान राहिले आहे. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो.

  • आज रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी.

  • आज पुण्याच्या विकासात योगदान देणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन.

  • तुम्ही मला भूमिपूजन आणि उद्घाटनाला देखील बोलावले, हे माझे भाग्य.

  • यापूर्वी भूमिपूजन होवून कधी उद्घाटन होणार हे माहित नसायचे. यातून एक संदेश जातो की योजनांना वेळेवर पूर्ण होवू शकतात.

  • आर. के. लक्ष्मण यांचे सुंदर आर्ट गॅलरी तयार केल्याबद्दल माई ढोरे यांचे कौतुक.

  • पुण्यात अधुनिक सुविधा ही लोकांची गरज. यासाठी सरकार कटिबद्ध.

  • मेट्रो पुण्यात प्रदुषणापासून सुटका देईल.

  • मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणविस या प्रकल्पासाठी सातत्याने दिल्लीला यायचे. अत्यंत उत्साहात असायचे. मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.

  • याशिवाय इतरही अनेक हातांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.

  • देशात वेगाने शहरीकरण होत आहे. शहरांची वाढती लोकसंख्या अनेक संधी आणि आव्हान घेवून येते.

  • उड्डाणपूल वाढवणे, रस्ते विस्तारीकरण करणे यावर मर्यादा असतात. यावर केवळ मास ट्रान्सपोर्टेशन हा एकमेव उपाय.

  • महाराष्ट्रामध्ये मेट्रो नेटवर्कचा विस्तार होत आहे. माझा हा आग्रह आहे की समाजातील प्रत्येक वर्गाने मेट्रोचा वापर करावा.

  • २१ व्या शतकात आपल्याला आपल्या देशाला अधुनिक बनवायला हवे, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ग्रीन ट्रान्सपोर्टचा वापर वाढवा.

  • आम्ही रेरा सारखा कायदा बनवला. आधी पैसे द्यायचे आणि घराची वाट बघत बसायचे. पण आता या मध्यमवर्गाला सुरक्षा देण्यासाठी हा कायदा मोठे काम करत आहे.

  • पुण्याची ओळख आता ग्रीन पुणे होत आहे.

  • इथेनॉलचा वापर वाढत आहे. इथून पुढे पुण्यात देखील तो वाढवा. त्याचा फायदा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील होईल.

  • स्पीड आणि स्केल या गोष्टी गरजेच्या. आपल्याकडे काही व्यवस्था अशा होता की महत्वाच्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी अनेक दिवस लागायचा.

  • मात्र आता पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनमुळे या गोष्टी बदलत आहेत.

  • ही भूमी संतांची आहे. काही दिवसांपूर्वी मला संत तुकाराम पालखी मार्गेचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली हे भाग्य.

  • याच इतिहासासह मी तुमची रजा घेतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या श्री. अंबाबाई देवीची मूर्ती देवून सत्कार केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,

  • पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली.

  • पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला म्हणून तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो. आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागेल.

  • मोदींना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं.

  • रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन अजित दादांचा टोला.

  • पुणे महानगरपालिका आगामी काळात विस्तारीकरणाचा अहवाल तयार करत आहे. या नव्या मार्गाना मान्यता द्या, अशी अजित पवार यांची मागणी

  • पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, अलिकडे काही महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होतं आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत.

  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला.

  • या महामानवांच्या कार्यांच्या उत्तुंग विचारांचा आदर्श आपल्या सर्वांना पुढे घेवून जायचे आहे, असे म्हणतं त्यांनी राज्यपालांना व्यासपीठावरच सुनावले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एमआयटी कॉलेजच्या मैदानावर जंगी सभा. सभेला व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार चंद्रकात पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित आहेत.

पंतप्रधान मोदी आनंदनगरहून एमआयटी कॉलेज मैदानाच्या दिशेने रवाना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर दाखल. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे केले उद्घाटन. तिकीट काढून पंतप्रधान मोदी यांचा गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रोचा प्रवास.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून PM मोदींचा सत्कार करण्यात आला आहे. वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत मोदी शिवरायांच्या चरणी नतमस्तक.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर आगमन. थोड्याच वेळात महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार.

पंतप्रधान मोदी यांच्या फेट्यावर वापरण्यात आलेली राजमुद्रा काढण्याची वेळ भाजपवर आणि महापौर मोहोळ यांच्यावर आली आहे. काँग्रेस आणि मराठा संघटनांच्या आक्षेप आणि विरोधानंतर ही राजमुद्रा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची राष्ट्रवादी कॉग्रेसने (NCP) ने उपहासात्मक फलक लावून खिल्ली उडवली आहे. ''मोदीजी आले, मोदीजी आले, अरे हो इलेक्शन आले..'' अशा आशयाच्या फलक राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दैारा असल्याचे नकळत राष्ट्रवादीने या फलकाच्या माध्यमातून सांगितले आहे. समाज माध्यमांवर या फलकाची चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसने #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा, #GoBackModi असे हॅशटॅग चालवले आहेत. तसेच या आशयाचे बॅनर्स देखी लावण्यात आले आहेत. नेहमीच महाराष्ट्रासोबत दुजाभाव करणारा, महाराष्ट्राची बदनामी करणारा #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असे यावर लिहण्यात आले आहे.

मेट्रोचे काम अर्धवट असताना उद्घाटन केले जात आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुणे इथे बोलताना लगावला होता. त्यांच्या या टोल्याला आता भाजपने प्रतिटोला लगावला आहे. भाजपने ट्विट करत म्हटले आहे, "पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही"

पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी खास असा शाही फेटा तयार करवून घेतला आहे. या फेट्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क ऑस्ट्रेलियन डायमंडपासून आणि सोन्याच्या वापरापासून बनवला आहे.

असा आहे पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा :

पंतप्रधान मोदी यांचे ६ मार्च रोजी सकाळी १०:३० मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ते COEP मैदानावर हेलिकॉप्टरने येतील. तिथून ते गाडीने महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणार आहेत. १० मिनिटांत हा कार्यक्रम संपवून ते मेट्रोच्या उद्घाटनासाठी जंगली महाराज रस्ता, खंडूजी बाबा चौक या मार्गे गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनवर येणार आहेत. तिथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.

आनंदनगर मेट्रो स्टेशनवरुन मोदी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी जाणार आहेत. ही सभा संपल्यानंतर ते गाडीने पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौकातून वळून सिंचननगर येथील हेलिपॅडवर जाणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. हा कार्यक्रम संपवून दुपारी ३ च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार :

पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासोबतच पुणेकरही सज्ज. शहरभरात मोदींच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com