Congress Leader Criticize On Modi : मोदींनी नऊ वर्षांत देशावर शंभर लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला, 'या' बड्या नेत्याचा सनसनाटी आरोप

Pune Political News : '' जनसंवाद यात्रा ही केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधातील लढाई...''
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

Pimpri Chinchwad : देशात २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या बँका, रेल्वे, विमानतळ, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून ६७ वर्षांत सर्व सरकारांनी मिळून ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले. पण, मोदी सरकारने मागील नऊ वर्षात तब्बल शंभर लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या सुरु असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नागपुरात हल्लाबोल केला. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षात त्यांनी देशावर शंभर लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केल्याचा खळबळजनक आरोप पटोलेंनी यावेळी केला. याचवेळी त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या सुरु असून पटोले यातला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

PM Narendra Modi Latest Marathi News
Maratha Reservation News : मराठा तरुणांच्या आत्महत्यांमुळे माझं मन व्यथित; आरक्षणावरून सरकारने समाजाची फसवणूक करू नये !

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस(Congress) सरकारने देशात सुईपासून रॉकेटपर्यंत विकास केला. चंद्रावर नुकतेच जे चांद्रयान-३ उतरले,त्या `इस्रो`ची स्थापना सुद्धा काँग्रेस सरकारच्या काळात झाली,याकडे पटोलेंनी लक्ष वेधले. जनसंवाद यात्रा ही केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधातील लढाई असल्याचे पटोले म्हणाले.

PM Narendra Modi Latest Marathi News
Kolhapur Politics : उद्धव ठाकरेंनी नव्या नियुक्त्या करताच दोन जिल्हाध्यक्ष नॉट रिचेबल !

मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, औषधे महाग केली, शेतीला लागणाऱ्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले,अशी तोफ पटोलेंनी डागली. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढून मोदी त्यांच्या मित्रांचे खिसे भरत आहेत. सत्तेत येताच मोदी सरकार(Modi Government) संविधानच संपवायला निघाले,असा आणखी एक आऱोप त्यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com