पुणे : ''विद्यार्थ्यांमुळेच जागतिक पातळीवर भारताची पत वाढली. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणणे सहज शक्य झाले,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिम्बायोसिस विद्यापीठाच्या (Symbiosis University)सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सांगितले. 'सिम्बायोसिस'चे संस्थापक डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी मोदींचे स्वागत केले.
''युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga)हाती घेण्यात आलं आहे. 'ऑपरेशन गंगा' हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. इतर कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने करुन दाखवले आहे. सर्व अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतिक आहे,'' असे मोदी म्हणाले.
''विद्यार्थ्यांनो तुमची पिढी नशीबवान आहे. तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावा लागत नाही. असुरक्षिततेच्या मानसिकतेचा सामना करावा लागत नाही,देशात हा बदल आला आहे. त्याचं श्रेय या देशातील युवकांना जातं. ज्या क्षेत्रात देश आपल्या पायांवर पुढं जाण्याचा विचार करत नव्हता त्यात भारत ग्लोबल लीडर बनण्याच्या वाटेवर आहे,'' असे मोदी (pm Narendra Modi)यांनी सांगितले.
मोदी यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर मोदींच्या (Narendra Modi)हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro)उद्धघाटन झाले. मोदींनी गरवारे कॅालेज ते वनाज असा मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा झाली.''महाराष्ट्रात मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणेकरांना आज इलेट्रॅानिक बस, मेट्रो मिळाली. मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी,'' असे आवाहन मोदींनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.