PMC Election : पुण्यात मुरलीअण्णांच्या एकाही जवळच्या कार्यकर्त्याला तिकीट नाही, एका उमेदवाराचा भरलेला अर्जही काढून घेतला : इतर मातब्बरांनाही घराणेशाहीच्या नियमाचा फटका

PMC Election : पुणे महापालिकेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यानिमित्त उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सकाळपासून बराच गोंधळ पाहायला मिळाला.
BJP PMC Election
BJP PMC Election
Published on
Updated on

PMC Election : पुणे महापालिकेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यानिमित्त उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सकाळपासून बराच गोंधळ पाहायला मिळाला. सर्वच राजकीय पक्षांबाबत ही गोष्ट पाहायला मिळाली. पुण्यात भाजपनं शिवसेनेसोबत युती केलेली असली तरी सर्वाधिक जागांवर भाजपनं आपले उमेदवार उभे केले आहेत. पण यंदा पक्षातील अनेक दिग्गजांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना तसंच कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्याचं टाळलं आहे. त्याऐवजी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना भाजपनं संधी दिली आहे.

BJP PMC Election
Nashik Election: "नवीन कार्यकर्त्यांना डावलता येत नाही", जुन्या कार्यकर्त्यांवर भडकले गिरीश महाजन; गोंधळ घालणाऱ्यांची करणार चौकशी

भाजपच्या तिकीट वाटपात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील झटका बसला आहे. कारण त्यांच्या एकाही जवळच्या कार्यकर्त्याला भाजपनं उमेदवारी दिलेली नाही. प्रभाग क्र. 31 मधून AB फॉर्म दिलेल्या निलेश कोंढाळकरांना भाजपनं माघार घ्यायला लावली. तसंच श्रीधर मोहोळ, दुष्यंत मोहोळ यांची उमेदवारी कापली असून मेधा कुलकर्णी यांच्या मुलीला, माधुरी मिसाळ यांच्या मुलाला, सुनील कांबळे यांच्या मुलीला उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण त्यांना उमेदवार दिलेली नाही.

BJP PMC Election
Pune Politics: धंगेकर म्हणतात युती तुटली अन् सावंत म्हणतात नाही; पुण्यात शिवसेनेनं नेमका काय घोळ घातला?

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी भाजपमध्ये आलेले आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपच्या सगळ्या स्थानिक नेत्यांना भारी पडलेत. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी भाजपकडून 2 AB फॉर्म मिळवले. तर अन्य 5 फॉर्म कार्यकर्त्यांसाठी मिळवल्याची माहिती आहे. याशिवाय माजी आमदारांपैकी योगेश मुळीक, दिवंगत मुक्ता टिळक, गिरीश बापट यांच्या कुटुंबियांना मात्र भाजपनं उमेदवारी दिली आहे.

BJP PMC Election
Andekar Vs Komkar: आंदेकरांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीने तिकीट देताच कोमकरही रिंगणात! नाना पेठेत दोन्ही गँग पुन्हा भिडणार

त्यामुळं सध्या राज्यात किंवा केंद्रात मंत्रीपद दिलेल्या नेत्यांच्या तसंच विद्यमान आमदार-खासदार असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा कुटुंबियांना भाजपनं सबुरीचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडं माजी आमदार-खासदारांच्या जवळच्या लोकांना मात्र उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर उर्वरित बऱ्याच जागांवर ताज्या दमाच्या नव्या उमेदवारांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीतील ९९ जागांचा विक्रम मोडण्याचा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com