PMC Election : `भाजपसाठी 25 ए प्लस प्रभाग! 100 च्या खाली येणार नाही..`

पुणे महापालिकेची निवडणूक (PMC election) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार
Jagdish Mulik-Ganesh Beedkar
Jagdish Mulik-Ganesh Beedkarsarkarnama

पुणे : पुणे महानगरालिकेची (PMC election) प्रतिक्षा असलेली प्रस्तावित प्रभागरचना आज जाहीर झाली. या प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचा आरोप पुणे शहर भाजपने (Pune BJP) केला. मात्र तरीही पुण्यात भाजप १०० पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल, असा विश्वास भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केला. पुणे पालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांच्या म्हणण्यानुसार भाजपसाठी 25 प्रभाग हे ए प्लस आहेत. या 25 प्रभागांत भाजपचे तीनही नगरसेवक निवडून येणार. अन्य प्रभागांत आम्ही जादा जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येऊ, असा दावा त्यांनी केला.

Jagdish Mulik-Ganesh Beedkar
भाजपचे सात नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

पुण्यात 173 वाॅर्डांची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा आणि तोटा कोणाला, याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बोलताना मुळीक म्हणाले की भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढ विश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महविकास आघाडी सरकारवरील जनतेचा रोष यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या १०० हून अधिक जागा निवडून येतील.

Jagdish Mulik-Ganesh Beedkar
PMC Election : धानोरी-विश्रांतवाडीत दोन जागा राखीव, राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी दोनचा प्रभाग

ते म्हणाले, ``महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह असल्याने आराखडा प्रसिद्ध होण्यास विलंब झाला. आराखडा तयार करताना त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. प्रभागांची तोडफोड करून नवीन रचना करण्यात आली. आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीवर भाजप सहज विजय संपादन करू शकेल असा विश्वास वाटतो.

मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, पीएमपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी, नदी शुध्दीकरण योजनेला गती, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम, सेवा कार्य आणि प्रभाग स्तरावर नगरसेवकांनी केलेली विकासकामे या जोरावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरू, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश बीडकर यांनी सांगितले की राष्ट्रवादी काॅंग्रेसने कितीही प्रभागांची तोडफोड केली तरी भाजपच पुण्यात एक नंबर पक्ष राहणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची युती झाली तरी त्याचा भाजपच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना चेहरे मिळणे अवघड होणार आहे. त्यासाठी भाजपच्या नगरसेवकांना प्रलोभन दाखविण्याचे काम सुरू आहे. मात्र आम्ही देखील जशास तसे, उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com