पोलिस आयुक्त कृष्णप्रकाशांनी दृष्टीहिनांसोबत केली रंगाची मुक्त उधळण!

दृष्टिहीनांकडे दृष्टी नाही, मात्र दूरदृष्टी आहे. रंगांची ओळख नसली, तरी ते आयुष्यात सप्तरंग भरत असतात, असे साहित्यिक विचार या दबंग पोलिस अधिकाऱ्याने या वेळी मांडले.
Krishnaprakash
Krishnaprakash Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : ज्या शहरात नियुक्ती असेल, तेथे दिवाळी आणि होळी आयपीएस कृष्णप्रकाश (Krishnaprakash) आपल्या हटके स्टाईलने साजरी करीत असतात. गेली दिवाळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अनाथ मुलांबरोबर गोड केली होती, तर,रंगांची उधळण करणारा धूलिवंदनाचा सण आज (ता. १८) त्यांनी डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टिहीनांसोबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात साजरा केला. दृष्टिहीनांकडे दृष्टी नाही, मात्र दूरदृष्टी आहे. रंगांची ओळख नसली, तरी ते आयुष्यात सप्तरंग भरत असतात, असे साहित्यिक विचार या दबंग पोलिस अधिकाऱ्याने या वेळी मांडले. (Police Commissioner Krishnaprakash celebrated Dhulivandan with blind person)

आयुक्तालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही आज मुक्तहस्ते रंगाची उधळण केली. त्यामुळे दररोजचे आयुक्तालयाचे शिस्तीचे वातावरण आज काहीसे वेगळे व हलके झाल्याचे पहायला मिळाले. आस्था हँडीक्राफ्ट्समधील वीस दृष्टिहीनांसह पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी धुळवड आनंदात साजरी केली. त्यातून हे दृष्टीहिन मोठे खूष झाल्याचे पहायला मिळाले. त्यांच्यातील अमृता क्षेत्रे या विद्यार्थिनीच्या प्रार्थनेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Krishnaprakash
कात्रजच्या अध्यक्षांना ZPच्या माजी उपाध्यक्षांचे आव्हान; तर मामा-भाच्यांत कोण बाजी मारणार

संदीप भालेराव, अशोक जाधव, तृप्ती भालेराव, गोरख घनवट यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. कृष्ण प्रकाश यांनी रंगांची ओळख करू देत सर्व दृष्टिहीनांना रंग लावला, त्यांनीही आयुक्तांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. दृष्टी नसणे ही मोठी खंत आहे. मात्र, आयुष्यात दुरदृष्टी ठेऊन यशस्वी व आनंदित राहता येते, हे उदाहरण आज समोर असल्याचे आयुक्त म्हणाले.

Krishnaprakash
करुणा शर्मा तर परळीतून लढणार होत्या; कोल्हापुरातून लढणार हे मोठे आश्चर्यच!

राष्ट्रवादी युवककडून पिंपरीत भाजपच्या भ्रष्टाचाराची होळी

दरम्यान, होळीचा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात शहरात साजरा झाला. युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी चिंचवड पालिकेतील मावळते सत्ताधारी भाजपच्या गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची सायंकाळी होळी केली. त्यात भाजपच्या विविध घोटाळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.

Krishnaprakash
कोल्हापूर उत्तरसाठी पक्षश्रेष्ठींना दोन नावे कळवली; पण आम्ही या नावावर आग्रही!

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे इम्रान शेख यांच्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयाजवळील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ही राजकीय होळी पेटविली गेली. भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनतेचा आक्रोश असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनता या भ्रष्ट भाजपाला माफ करणार नाही व त्यांची योग्य जागा दाखवून देईल,असे गव्हाणे व शेख या वेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com