Pune Lalit Patil Drug Case News : मागील अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रगमाफिया ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यानंतर त्यांने मोठा खुलासा केला आहे. तो पळून गेल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती, पण 'मी ससूनमधून पळून गेलो नाही, तर मला पळवलं गेले," असा मोठा गौप्यस्फोट ललितने केला आहे. यानंतर आता पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर प्रतिक्रिया देताना धंगेकर म्हणाले, "अमली पदार्थांच्या विषयावरून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावर मी सातत्याने बोलत आहे. यातील आरोपी ललित पाटील पंधरा दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांच्या दहा जणांच्या टीमला तो सापडला नाही, मात्र मुंबई पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणात आजी-माजी पोलिस अधिकारी सामील आहेत, राजकीय वरदहस्त त्याला आहे," असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला.
धंगेकर म्हणाले, "आज तो (ललित पाटील) बोलतोय की, मी पळालो नाही तर मला पळवलं गेलंय. यावर आता किती विश्वास ठेवावा हा विषय वेगळा आहे. केंद्रीय चौकशी समितीमार्फत याची चौकशी झाली पाहिजे. यात गुंतलेले राजकीय नेते, ज्या पोलिसांनी ललित पाटीलला संरक्षण दिलं ते, डॉक्टर, तुरुंग अधिकारी यांना सहआरोपी करून यांना या प्रकरणात आरोपी केलं पाहिजे, असे धंगेकर म्हणाले.
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.