धक्कादायक : कर्मचाऱ्यांकडून एक कोटी रुपये गोळा करुण द्या; थेट 'आरटीओ'लाच धमकी

आरटीओला धमकी दिल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे
pune crime
pune crimesarkarnama
Published on
Updated on

पुणे : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तक्रारी बंद करण्यासाठी व एक कोटी रुपये गोळा करुन देण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.

सचिन काशिनाथ गव्हाणे (रा. राजगुरुनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (Ajit Shinde) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सचिन गव्हाणे याच्या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक होता. त्याचा भाऊ समीर गव्हाणे याने सचिनच्या परस्पर संबंधित ट्रकच्या कागदपत्रांवर सचिन गव्हाणे याची स्वाक्षरी करुन त्याची विक्री केली होती.

pune crime
अजितदादांनी सांगितले शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्याचे कारण...

याप्रकरणी सचिन गव्हाणे याने त्याच्या भावासह पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, भोसरी पोलिसांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई येथील परिवहन आयुक्‍तांकडे केला होता. संबंधित प्रकरणी विभागीय चौकशी सध्या सुरु आहे. दरम्यान, सचिन गव्हाणे याने विविध कार्यालयामध्ये परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध ईमेल व तक्रार अर्ज केले आहेत. याप्रकरणी शासनाने फिर्यादींना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, गव्हाणे, त्याची पत्नी यांनी आपापसात संगनमत करुन फिर्यादींच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी बंद करण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपये घेऊन देण्याची मागणी फिर्यादीकडे केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच एकतर्फी 85 लाख रुपये रक्कम निश्‍चित करुन, हि रक्कम फिर्यादी यांनी गोळा करुन द्यावी, अशी वारंवार मागणी करीत होते. या सगळ्या प्रकाराला फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी शिंदे यांना धमक्‍या देण्यास सुरुवात केली. तसेच राज्यघटनेबाबत अवमानकारक ईमेल फिर्यादी यांचे तसेच अन्य कार्यालयांना पाठविले. तसेच फिर्यादी शिंदे यांच्याविषयी बदनामीकारक व अश्‍लिल मजकुर लिहून त्यांची बदनामी केली.

pune crime
खासदार तुमाने म्हणाले, माझ्या घरी काल बैठक झालीच नाही, काल नागपुरात होतो !

भोसरी पोलिस ठाण्यात वाहन विक्री प्रकरणी एका व्यक्तीसह पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. त्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सचिन गव्हाणे व त्याची पत्नी करीत होते. ते पैसे मी गोळा करून द्यावेत, यासाठी माझ्याकडे मागणी करून मला धमकी देत होते. कार्यालय प्रमुख म्हणून या प्रकराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com