Koyta Gang News : पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा कित्ता पिंपरीचे नवे आयुक्त गिरवतील का ?

Koyta Gang News : पिंपरी-चिंचवड शहरात कोयते हे काहीजणांनी बिनधास्त आपल्या डीपीवर ठेवले होते.
Koyta Gang News :
Koyta Gang News :

Koyta Gang News : पुण्यातील कोयता गँगच्या (Koyta Gang) उच्छादाचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडल्यानंतर पुणे पोलिसांनी या गँगवर नुकताच `मोका` लावला.दुसरीकडे पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयातही कोयता गँगवर सक्रिय असून आता,तर त्यांनी उच्छादच त्यातही मावळ तालुक्यात मांडला आहे.

तीन दिवसांपूर्वी (ता.१०) मावळ तालुक्यातील चांदखेड गावाच्या जत्रेत पाचजणांच्या टोळीने कोयते, गावठी कट्टा हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. त्यांनी कोयत्याने मोटारींच्या काचा फोडल्या.तमासगीरांच्या पत्र्यांच्या पेट्यांवर वार केले.यात्रेचे फ्लेक्स फाडले.एवढेच नाही,तर गोळीबार करीत त्यांनी उच्छाद केला होता.

गोळीबाराचा व्हिडिओ `ए.जी.कंपनी, किंग ऑफ चांदखेड` या नावाने व्हायरल करण्याचे डेअरिंगही केले होते. त्यामुळे मावळात मोठी दहशत पसरली होती.शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांतच याच पोलिस ठाण्यात आणखी एका कोयते गॅंगने गुरुवारी (ता.१२) उच्छाद मांडला.

Koyta Gang News :
BMC News : राजकीय नेत्यांनंतर ED च्या रडारवर आता प्रशासकीय अधिकारी ; महापालिका आयुक्तांना समन्स

शिरगाव येथील साई पॅलेज लॉजवर या टोळीने दरोडा टाकला. कोयत्यांनी त्यांनी सीसीटीव्हीचे कॅमेरे आणि त्याचा पीसी फोडला. तेथील कर्मचाऱ्यावर वार करून त्याचा मोबाईल आणि गल्यातील रोकड हिसकावून ते पळून गेले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोयते हे काहीजणांनी बिनधास्त आपल्या डीपीवर ठेवले होते. कोयत्याने वाहनांची नासधूस अनेक ठिकाणी करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.मात्र, मावळात दोन दिवसांच्या फरकाने दोन कोयता गॅंगच्या दहशतीच्या हल्ल्याच्या आणि दरोड्याच्या घटना घडल्या.

Koyta Gang News :
Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

त्यामुळे पुण्याचे नवे पोलिस आय़ुक्त रितेशकुमार यांच्याप्रमाणे पिंपरीचे नवे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही कोयता गॅंगविरुद्ध मोकासारखे हत्यार उपसण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोयता गॅंगचा उच्छाद रोखण्यासाठी अशा कडक कारवाईची गरजही वाटू लागली आहे.

अजित पवारांच्या या मागणीनंतर पुणे पोलिसांनी कोयता गँगवर कारवाई केली आहे. या गँगच्या टोळीप्रमुखासह १३ जणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.यापैकी दहा जणांना अटक केली आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही बाब गांभीर्याने घेत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी विशेष पथक स्थापन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com