तीनशे कोटींच्या क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

शेअर दलालाच्या अपहरणाचा पोलिसाचा प्रयत्न पोलिसांनीच (Pimpri Police) हाणून पाडला आहे.
IPS Krishna prakash
IPS Krishna prakash Sarkarnama

पिंपरी : रक्षकच भक्षक झाल्याची घटना नुकतीच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chanchwad) घडली. शहर पोलिस मुख्यालयातील (Pimpri Police) पोलिस शिपायाने शेअर ट्रेडींग व्यावसायिकाचे अपहरण केले. पण, पोलिस मागावर असल्याचे समजताच त्याने त्याला सोडून दिले. पुढील चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली. अपह्ताकडे तीनशे कोटी रुपये मूल्याची क्रिप्टोकरन्सी असल्याच्या गैरसमजातून या पोलिसाने त्याचे अपहरण केल्याचे (Police kidnap trader) पोलिस चौकशीत निष्पन्न झाले.

IPS Krishna prakash
कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली कबूली

दिलीप तुकाराम खंदारे (रा.भोसरी, मूळगाव कोनाटी, ता.सिंदखेडराजा,जि.बुलढाणा), असे या पोलिसाचे नाव आहे. त्याच्यासह आठजणांच्या या सोनेरी टोळीला पकडण्यात आले आहे. त्याबाबत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (CP Krishna Prakash) यांनी पत्रकारपरिषद घेऊन ही कामगिरी केलेल्या वाकड पोलिसांचे कौतूक केले. खंदारे याला यापूर्वी २०१९ मध्ये लाचखोरीच्या गुन्ह्यात चिखली येथे पकडण्यात आले होते. तर, त्याच्याबरोबर पकडण्यात आलेले सुनील राम शिंदे (वय ४१,रा. खारदांडा,मुंबई)याच्याविरुद्ध मुंबईत खार पोलिस ठाण्यावर चार आणि शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे,नवी मुंबई)याच्यावरही मुंबईत (कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे) आणि जेजूरीत असे दोन गुन्हे नोंद आहेत. वसंत शामराव चव्हाण (वय४७,रा.नालासापोरा.जि.ठाणे),फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (वय ५०,रा. कल्याण),मयूर महेंद्र शिर्के (वय ५,रा. खार,मुंबई),प्रदीप काशीनाथ काटे, संजय ऊर्फ निकी राजेश बंसल अशी इतर आरोपींची नावे आहेत.

खंदारे हा सायबर क्राइममध्ये मास्टर आहे. पूर्वी तो पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये कामाला होता. त्याने ऑफिस टेगुन्हे प्रणाली, अॅ़डव्हान्स सायबर क्राइम इनव्हेस्टीगेशन टेक्नालॉजी, मोबाईल फॉरेन्सिक, बेसिक अॅन्ड हार्डवेअर इन्फर्मेशन असे कोर्सेस केलेले आहेत. ताथवडे येथील विनय सुंदरराव नाईक या शेअर ट्रेडींग करणाऱ्याकडे तीनशे कोटीची बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी असल्याची माहिती खंदारेला मिळाली होती. त्यामुळे या क्रिप्टोच्या हव्यासातून त्याने नाईकच्या अपहरणाचा डाव रचला. त्यात वरील साथीदारांना त्याने सामावून घेतले.

IPS Krishna prakash
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आता संयम सुटतोय, गुन्हेगारांना दिला इशारा...

१४ जानेवारीला ताथवडेतून नाईकचे मोटारीतून त्यांनी अपहरण केले. त्याला अलिबाग येथील एकांत हॉलिडेजमध्ये डांबून ठेवले. तेथे त्याच्याकडे आठ लाख रुपयांसह बिटकॉईनची मागणी करण्यात आली. दरम्यान, नाईकचा मित्र रफिक सय्यद याने वाकड पोलिसांत धाव घेऊन आपल्या मित्राला पळवून नेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आपल्या डीबीच्या पथकाला तपासाचा आदेश दिला. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणेश तोरगल व कर्मचारी अशा दोन टीम तयार करण्यात आल्या. दरम्यान, पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच खंदारे याने अपह्त नाईक याला जेथून पळवून नेले तेथेच पुन्हा आणून सोडून दिले. त्यांच्या चौकशीतून तसेच मोबाईल लोकेशनसह तांत्रिक मुद्यावर तपास करून वाकड पोलिसांनी मुंबईत जाऊन प्रथम चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या चौकशीतून नंतर तिघांना हिंजवडीतील हॉटेल रानजाई येथे पकडण्यात आले. तर, शेवटी मूख्य सूत्रधार पोलिस खंदारेची भोसरीत सापळा लावून धरपकड करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com